वरुण पाठक यांचा भाजपा जिल्हा कार्यकारिणीत सत्कार

इस खबर को सुनें

वरुण पाठक यांचा भाजपा जिल्हा कार्यकारिणीत सत्कार

Wardha — नुकत्याच जाहीर झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणी मधे वरुण पाठक यांना निमंत्रित सदस्य म्हणुन स्थान देण्यात आले त्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष वरुण पाठक यांचा भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा तर्फे सत्कार करण्यात आला.

काल दिनांक 25ला भाजपा जिल्हा कार्यकारिणीची बैठक हॉटेल हेरीटेज येथे आयोजीत करण्यात आली होती.बैठकीला
भाजपा विदर्भ संघटन मंत्री डॉ उपेंद्र जी कोठेकर,भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनिल गफाट, वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस,वर्धा जिल्हा प्रभारी गिरीश जी व्यास, वर्धा विधासभेचे आमदार डॉ. पंकज भोयर, विधान परिषद चे आमदार डॉ रामदास आंबटकर, आर्वी विधानसभा आमदार दादाराव केचे,प्रदेश सचिव सरिता गाखरे,भाजपा नेते श्री राजेश बकाने, जिल्हा संघटन महामंत्री अविनाश देव,अतुल तराळे,मिलिंद भेंडे,किशोर जी दिघे,प्रशांत बुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
या बैठकीत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वरुण पाठक यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश निमंत्रीत सदस्य पदावर निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वरुण पाठक यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व मला दिलेली जवाबदारी मी योग्यरित्या पार पाडणार असे सांगितले.
यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now