जागतिक बालकामगार दिनानिमित्त बालहक्क संरक्षण रॅली

इस खबर को सुनें

 

वर्धा (प्रती)

जागतिक बालकामगार दिनानिमित्त बालहक्क संरक्षण रॅली
चाईल्ड लाइन वर्धा यांच्या अंतर्गत सिद्धार्थ नगर बोरगांव (मेघे) परिसरामध्ये बालहक्क संरक्षण रॅली चे आयोजन करण्यात आले. चाईल्ड लाइन चे जिल्हा समन्वयक आशीष मोड़क यांच्या हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविन्यात आली. परिसरातील सर्व बालकांनी रॅली मध्ये सहभागी होऊन घोषवाक्य व प्रेरणादायी गिताच्या माध्यमातुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. रॅलीच्या समारोपिय कार्यक्रमात चाईल्ड लाइन जिल्हा समन्वयक आशीष मोड़क यांनी बालकांचे हक्क व अधिकार या संदर्भात माहिती दिली. बालकांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तसेच बाल लैंगिक शोषणावर माहिती दिली. बालकांचे चिमुकले हात मजूरिकरिता नसुन शिक्षणाकरिता आहेत. काळजी आणि संरक्षणांची गरज असणाऱ्या प्रत्येक बालकांसाठी अरोग्यसेवा,शिक्षणाकरिता मदत, बालकांना शोषणापासून मुक्त करण्याकरिता चाईल्ड लाइन १०९८ या आपत्कालीन फोन सेवेला २४ तास फोन करुण माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट चे जिल्हा समन्वयक आशिष मोहुरले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन अमर पाटिल यांनी तर आभार मंगेश चौधरी यांनी मानले. यशस्वीतेसाठी माधुरी शंभरकर, जयश्री निवल, शितल घोडराव, सूरज वानखेड़े,पुरुषोत्तम कांबळे, प्रदीप वनकर तसेच डॉ.आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय वर्धा व अनिकेत समाजकार्य महाविद्यालय वर्धा यांनी सहकार्य केले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now