जिजाऊ स्मारक येथे शिल्प लागावे यासाठी सर्व स्तरावर संपूर्ण सहकार्य करणार.* श्रीमंत राजे डॉ मुधोजी महाराज भोसले यांचे आश्वासन.

इस खबर को सुनें

*जिजाऊ स्मारक येथे शिल्प लागावे यासाठी सर्व स्तरावर संपूर्ण सहकार्य करणार.* श्रीमंत राजे डॉ मुधोजी महाराज भोसले यांचे आश्वासन.


*वर्धा येथील धुनीवाले चौकात दोन वर्षापासून तयार झालेले जिजाऊ स्मारक हे अजूनही मूर्ती वीना उभे आहे. स्वराज्य संस्थापिका राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या नावाने जिजाऊ स्मारक धुनिवाले मठ चौकात तयार झाले. तयार झालेल्या स्मारकाच्या जागेवर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प/मूर्ती लागावे अशी योजना तयार झाली. तयार झालेली ही योजना मात्र अनेक वर्ष फक्त कागदावरच राहिली. आज होईल उद्या होईल या विचारात आणि या प्रतीक्षेत वर्धा वासीयांनी दोन वर्ष वाट बघितली. शेवटी अखिल भारतीय मराठा महासंघ वर्धा येथील पदाधिकारी व शिवभक्तांच्या वतीने जिजाऊ स्मारकात जिजाऊ माँ साहे, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचे शिल्प/मूर्ती लागावे यासाठी प्रयत्न सुरू आहे. वारंवार निवेदने देऊन प्रशासनाला विनवण्या करण्यात आल्या. प्रसंगी आंदोलनही करण्यात आले. मात्र अजूनही स्मारकाच्या ठिकाणी शिल्प/मूर्ती लावण्याच्या प्रक्रियेला कुठल्या प्रकारची सुरुवात झालेली दिसत नाही. यामुळे शेवटी वर्धा जिल्ह्यातील मराठा महासंघाच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी मराठा महासंघाचे नागपूर विभागीय अध्यक्ष नरेंद्र मोहिते यांच्या नेतृत्वात, मराठा महासंघाच्या विदर्भ महिलाध्यक्षा सौ वंदनाताई रोटकर व नागपूर विभागीय सरचिटणीस दिपकराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरकर भोंसले घराण्याचे श्रीमंत राजे डॉ. मुधोजी महाराज भोसले यांची नागपूर निवासस्थानी आज भेट घेऊन जिजाऊ स्मारकबाबतचे संपूर्ण प्रकरण महाराजांच्या लक्षात आणून दिले. याबाबतच्या कागदपत्रांसोबत महाराजांना निवेदन देण्यात आले व रीतसर चर्चा करण्यात आली.
*लवकरच वर्धा येथिल जिजाऊ स्मारकाला प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेण्यात येईल व आवश्यक तो सर्व पाठपुरावा करून शासन स्तरावर सर्वोतोपरी मदत करण्यात येईल असे आश्वासन श्रीमंत राजे मुधोजी राजे भोसले यांनी यावेळी दिले.
भेटीदरम्यान वर्धा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री अरुण जगताप, कार्याध्यक्ष प्रा. उमाकांत डुकरे, संघटक राजूभाऊ वाकडे, शिंदे, वर्धा जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा साळुंके, महिला सरचिटणीस मीनाताई इंगळे व इतर सहकाऱ्यांचे श्रीमंत मुधोजी राजे भोसले यांनी स्वागत केले व अभिनंदन पर शुभेच्छा दिल्या.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now