*जिल्हा संघचालक मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर कार्यवाही करा* – आ. रामदास आंबटकर.

इस खबर को सुनें

*जिल्हा संघचालक मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर कार्यवाही करा* – आ. रामदास आंबटकर.

वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यावरून बसने प्रवास करीत असताना बसमधल्या युवकांनी हिंगणघाटच्या नांदगाव चौरस्त्यावर खाली उतरवीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंदजी राजपूत यांना जबर मारहाण केली. यात त्यांच्या कानाला व पाठीला गंभीर इजा झाली. प्रथम त्यांना हिंगणघाटच्या उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात व आता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केले जात आहे. या घटनेतील मुख्य आरोपीना अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषद सदस्य डॉ. रामदास आंबटकर यांनी केली आहे.
जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अशा कुत्सित बुद्धीने हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहे. यावर आळा घालण्याची गरजच नाही तर मुळापासून नष्टच करण्याची आवश्यकता आहे. हल्ले करणाऱ्या विरोधात कठोर असा कायदा करायला पाहिजे. जेणेकरून कुणीही हल्ले करण्याचा विचार करणार नाही. जेठानंदजी राजपूत यांच्यावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात कठोर अशी शिक्षा करावी अशी मागणी आ.डॉ. रामदास आंबटकर यांनी केली आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now