अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवायकांची बुलढाणा येथे जाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन वर्धा यांचेमार्फत करण्यात आली आहे.असे वर्धा परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे-

इस खबर को सुनें

वर्धा (प्रती)

            आज दिनांक १ जुलै २०२३ रोजी नागपूर वरून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्स(MH २९ BE १८१९) या खाजगी बसचा मौज पिंपळखुटा,तहसील सिंदखेड राजा,जिल्हा बुलढाणा येथे समृद्धी महामार्गवरती २ वाजताच्या सुमारास अपघात झाला असून सदर बसमध्ये वर्धा जिल्हातील काही प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती बुकिंग ऑफिस कडून प्राप्त झाली. यामध्ये प्रवाश्यांचे संपूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही. सदर बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष (07152-243446) अथवा शुभम घोरपडे,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (8888239900) यांच्यांशी संपर्क साधावा असे अहवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अपघातग्रस्त व्यक्तीच्या नातेवायकांची बुलढाणा येथे जाण्याची व्यवस्था जिल्हा प्रशासन वर्धा यांचेमार्फत करण्यात आली आहे.असे वर्धा परिवहन विभागाकडून कळविण्यात आले आहे

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now