समृद्धी महामार्गाचे ॲक्सीडेंटल ऑडिट करा:- मोहिते

इस खबर को सुनें

समृद्धी महामार्गाचे ॲक्सीडेंटल ऑडिट करा:- मोहिते

वर्धा :- समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यात ट्रॅव्हल्स ला झालेल्या भीषण अपघातात अनेकांच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली कुणाला नोकरीसाठी, कुणाला शिक्षणासाठी, कुणाला नातेवाईकांकडे जाण्याचा प्रवास हा अखेरचा ठरला समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला व त्यामुळे प्रत्येकाला जबर धक्का बसला या घटनेबाबत शोक व्यक्त करतांना वारसांना प्रत्येकी १० लक्ष रूपयांची शासकीय मदत तसेच त्यांचेवर आश्रित असलेल्या कुटुंबातील १ व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क प्रमुख सुबोध मोहिते यांनी केली आहे.
समृध्दी मार्ग जेव्हा पासून सुरू झाला तेव्हापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिका सुरू आहे या सिमेंट मार्गावरून गाडी जात असताना ती मोठ्या प्रमाणात उसळी घेते त्यामुळे यावर डांबराचा थर राहल्यास गाडी उसळी घेणारं नाही त्यामुळे अपघाताची संख्या लक्षात घेता या पद्धतीने या महामार्गाचे ॲक्सीडेंटल ऑडिट करण्याची मागणी सुबोध मोहिते यांनी यावेळी केली आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now