वर्धा परिवहन विभागाकडून महामार्गावर वाहन चालक वाहक यांची कसून चौकशी…

इस खबर को सुनें

वर्धा परिवहन विभागाकडून महामार्गावर वाहन चालक वाहक यांची कसून चौकशी…
खासगी लांब चालणाऱ्या बसेस तपासणीला वेग
वर्धा (प्रतिनिधी) समृध्दी माहामर्गवरील अपघाताचे प्रमाण बघुन वर्धा परिवहन विभागाने सतत अनेक उपाययोजना करायला हाती घेतले आहे.सतत वाहन तसेच चालक वाहक यांची कसून चौकशी तसेच वाहाणाचा विमा,वाहनाची इतर फिटनेस तपासणी.चालकाने मद्यपान केलेआहे काय?या संपूर्ण तपासणीला अत्यंत महत्व दिल्याने मागील काही दिवसात अपघात थांबले असे चित्र आहे.वर्धा येथील परिवहन अधिकारी श्री. समिरजी याकूब यांनी आपल्या कार्यालयातील संपूर्ण अधिकारी वर्गाला विश्वासात घेऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कारवाईला गती दिली आहे.या शिवाय शाळेकरू बसेस आणी इतर वाहने यांचे अनेकांचे परवाने संपलेले असुन .याकरिता सुटीच्या दिवशी नूतनीकरण करण्याची सोय करून देण्यात आली आहे.ज्या वाहनाचा परवाना संपलेला आहे त्यांनी नुतनीकारण करून घ्यावेत.असे आवाहन करण्यात आले आहे.अन्यथा परवाना नसणाऱ्या वाहनाला रुपये10 हजार दंड,योग्यता प्रमाणपत्र नसल्यास 9 हजार दंड,विमा नसल्यास 4 हजार दंड ,तसेच वायू प्रदूषण(p u c)नसल्यास 4हजाराचा दंड,लायसन्स नसल्यास 11 हजार दंड,चालकाचा बॅच नसल्यास 4 हजार दंड आकारण्यात येणार आहे.आजपर्यंत वर्धा परिवहन अधिकारी कार्यालयाने 28 वाहनाचे वर कारवाई केली असून जवळपास 98 हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now