हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.

इस खबर को सुनें

वर्धा (प्रतिनिधी)हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन.
हिंगणघाट येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे या मागणीसाठी दि.२४-७-२०२३ ला पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्यभूमी वर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनात हिंगणघाटचे माजी आमदार प्रा.राजुभाऊ तिमांडे, माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे, मेडिकल कॉलेज संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष वासुदेव पडवे, सामाजिक कार्यकर्ते श्यामभाऊ ईडपवार, सुरेंद्र बोरकर , श्रीरामजी येळणे, सुधाकर बंगाले, हर्षल गुंडे, चारुदत्त धात्रक,महेंद्र राऊत आणि आयुष राऊत इत्यादी तसेच हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले.
वर्धा येथे सावंगी व सेवाग्राम या ठिकाणी दोन वैद्यकीय महाविद्यालय असून हिंगणघाटच्या सभोवतालच्या परिसरात आरोग्य सेवेचा अभाव आहे. हिंगणघाट शहराची लोकवस्ती दीड लाखाच्या वर असून पोहणा,वडनेर, शेकापूर (बाई),कानगाव,अल्लीपूर, सावली वाघ, वाघोली सर्कलचा ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे. समुद्रपूर तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग जाम सर्कल, मांडगाव सर्कल, कांडळी सर्कल, गिरड सर्कल, कोरा सर्कल, नंदोरी सर्कलचा परिसर हिंगणघाट शहराला लागून आहे. सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे), हमदापुर सर्कलचा ग्रामीण भाग जवळ आहे.
हिंगणघाट मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार केला असता लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाख आहे. हिंगणघाट शहराला राळेगाव तालुक्यातील आदिवासी भाग, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-पांढरकवडा, वणी तालुक्याचा संपूर्ण परिसर लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका, चिमूर तालुका हिंगणघाट शहराला लागून आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलचा संपूर्ण भाग हिंगणघाट शहराला लागून आहे.
हिंगणघाट शहरातून नॅशनल हायवे नं.०७(४४) नागपूर ते हैदराबाद मार्ग कन्याकुमारी रोड जात आहे भौगोलिक दृष्ट्या सर्वांगीण विचार केला असता हिंगणघाट शहराला लागून आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याचा भाग लागून आहे. वर्धा ते बल्लारशा ते आंध्रप्रदेश रेल्वे मार्ग हिंगणघाट शहरातून जात आहे आंध्रप्रदेशचे ते चंद्रपूर ते नागपूर हायवे जाम चौरस्ता लागून असून हिंगणघाट शहराला लागून आहे. असे असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे द्यावे या करीता धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे सुरु आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now