*लोककलावंतांचा श्रीक्षेत्र शिर्डी येथे राज्यस्तरीय महामेळावा !* न्याय व हक्कासाठी एकवटणार कलावंत ! शाहीर उत्तम गायकर

इस खबर को सुनें

*लोककलावंतांचा श्रीक्षेत्र शिर्डी येथे राज्यस्तरीय महामेळावा !*
न्याय व हक्कासाठी एकवटणार कलावंत ! शाहीर उत्तम गायकर !

लोककलेतुन समाज प्रबोधन करून लोकशिक्षण देऊन, विविध प्रकारच्या लोककला सादर करणारे लोककलावंत आज शासनाच्या उदासीन धोरणामुळे हवालदिल, वंचित, उपेक्षित होऊन बेसहारा जीवन जगत आहे. अशा प्रबोधनकार असणाऱ्या लोककलावंताचे राज्यस्तरीय लोकसंघठन निर्माण व्हावे, यासाठी भारत सरकारच्या सॉंग अँड ड्रामा विभागा अंतर्गत रजिस्टर्ड असलेल्या प्रतिथयश कलावंतांची राज्यस्तरीय शिखर संस्था, शासन नोंदनीकृत लोककलावंत प्रबोधन परिषद, महाराष्ट्र राज्यच्या वतीने दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० ते सायं ५ वाजेपर्यन्त श्रीक्षेत्र शिर्डी येथे एक दिवशीय लोककलावंत महामेळावा तथा चिंतन व धोरण कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे..
सदर महामेळावा तथा कार्यशाळेचे उद्घाटन खासदार सुजय विखे पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे यांचे हस्ते होणार असुन
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन नाशिक लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत आप्पा गोडसे हे ही उपस्थित राहणार आहे. अशी माहिती निमंत्रक तथा प्रवक्ता शाहीर उत्तम गायकर यांनी दिली .

सदर कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यात जिल्हा संघटक, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष , तालुका संघटक, यांची निवड़ करून मान्यवारांच्या हस्ते नियुक्ति पत्र देण्यात येणार असुन संस्थेचे ध्येय, उद्देश्य, भविष्यातिल नियोजन, कलावंताना अडचणी च्या वेळप्रसंगी आर्थिक सहयोग, मेळावे आयोजन, पुरस्कार वितरण व गाव तिथे शाखा बांधनी या विषयी विचार विनिमय करून धोरण निश्चिती करण्यात येणार आहे .
या राज्यस्तरीय लोककलावंत कार्यशाळेस बहुसंख्य लोककलावन्त, वादक यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन लोककलावन्त परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शाहिर सुभाष गोरे , सचिव शाहिर बालासाहेब मालुस्कर, समन्वयक गजेंद्र गवई यांचे सह निमंत्रक तथा प्रवक्ता शाहीर उत्तम गायकर यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केले आहे .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now