महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या विधी सेवा सल्लागार पदी ॲड श्री.चंदन ॲड. महल्ले यांची नियुक्ती

इस खबर को सुनें

महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या विधी सेवा सल्लागार पदी ॲड श्री.चंदन ॲड. महल्ले
वर्धा ( प्रतिनिधी)
पत्रकारांच्या व्यथा समस्या तसेच कायदेशीर अडचणी बघून पत्रकारांना कायदे विषयक मदत देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाने राज्य भर तज्ञ वकिलांचा संघटनेत  समावेश करून घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालवले  आहे या अनुषंगाने आजवर अनेक जिल्ह्यात नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.  आज  जिल्ह्याच्या विधी सेवा सल्लागारपदी जिल्ह्याचे अध्यक्ष पत्रकार मंगेश चौरे यांनी मागील वीस वर्षापासून न्यायालयीन कामकाजात तरबेज असलेल्या ॲड श्री एस. एस चंदन तसेच ॲड. कांचन  महल्ले (खोडके)यांची नियुक्ती केली आहे.हल्ली पत्रकारांची मुस्कटदाबी होत असुन विविध स्तरातून पत्रकारांना गुरफटले जात आहे.ठिकठिकाणी बनावट गुन्हे दाखल करून पत्रकारांची प्रतिमा मलिन केली जात आहेत.या सर्व कायदेशीर विषयाला महत्व देऊन
जिल्ह्यातील पत्रकारांना कायदेविषयक अडचणींना कायदेशीर मदत करण्याच्या दृष्टीने संघटनेच्या वतीने तज्ञ वकिलांची विधी सल्लागार म्हणून  नियुक्ती करण्यात येत आहे.या नियुक्ती बद्दल राज्य अध्यक्ष ,राज्य पदाधिकारी ,जिल्हा  अध्यक्ष यांचे आभार मानले,तर अनेकांनी यांचे अभिनंदन केले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now