अन्याय अत्याचार विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार : दीपक भाऊ निकाळजे

इस खबर को सुनें

              अहमदनगर मधील पीडित मुलांचे वेगवेगळे FIR घ्या

महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या मागासवर्गीय अल्पसंख्यांक महिला यांच्यावर होणाऱ्या

                                                                        अन्याय अत्याचार विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन उभारणार : दीपक भाऊ निकाळजे

श्रीरामपूर (प्रति)

श्रीरामपूर जि.अहमदनगर मधील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये मारहाण झालेल्या चार मुलांना भेटीसाठी व त्यांची विचारपूस करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे राष्ट्रीय अध्यक्ष आयु दीपक भाऊ निकाळजे यांच्या समवेत शेकडो कार्यकर्ते आले होते यावेळी शासकीय विश्रागृहावर याठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपक भाऊ निकाळजे म्हणाले की, पीडित मुलांपैकी काही मुले मातंग समाजातील व काही मुले बौद्ध समाजातील आहेत मात्र एकाच मुलाच्या नावानं बाहेर दाखल केलेले असून हे सरळ चुकीचे आहे त्यामुळे प्रत्येक मुलाच्या फिर्यादीनुसार नवीन तक्रार दाखल करणे गरजेचे आहे सदर अन्याय झालेल्या मुलांच्या नावाने
1) कुणाल देविदास मगर
2) शुभम विजय मागाडे
3)ओम अशोक गायकवाड
4) प्रणय अरविंद खंडागळे या 4 मुलांच्या फिर्यादीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची माध्यमातून हक्क आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून दिले आहेत आणि कायदा आमच्या बापाचा आहे कायदा आमच्या बापाने लिहून ठेवला आहे आम्ही शांत आहे मात्र आमच्या शांततेचा कोणी अंत पाहू नये. इथून पुढे महाराष्ट्रामध्ये कुठेही दलितांवर अन्याय अत्याचार झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल असे निकाळजे यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले आहे तसेच सदर मागासवर्गीय ४ मुलांच्या कुटुंबातील एक व्यक्तीस शासकीय सेवेत रुजू करण्यात यावा त्याच पद्धतीने माण जि.सातारा पालवण या गावात संपूर्ण गावा च्या वेशी समोर समोर एका महिलेला बेदम लाथा बुक्क्यांनी मारहाण होते उभा गाव समोर पाहतो मात्र त्या आरोपींना तत्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे संबंधित घटनाही क्रूर व लज्जास्पद आहे अशा जातीवादी प्रवृत्तीच्या लोकांना जाग्यावर ठेचणे गरजेचे आहे तसेच वाई मधील मातंग समाजाच्या मुलीवर अत्याचार होऊ नये त्यांचे आरोपी आज ही मोकाट आहेत सातत्याने अन्याय अत्याचार वाढत आहे तरी
मागासवर्गीयांच्या अल्पसंख्यांक महिला शोषित पीडित यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) हा पक्ष ठामपणे उभा राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला यावेळी महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ महाराष्ट्र संघटक कैलास भाऊ जोगदंड उत्तर अध्यक्ष शशिकांत दारुडे नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे उत्तर अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे जिल्हा सचिव किरण बगाडे उपाध्यक्ष सुनील ओव्हाळ राजू ओव्हाळ व शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now