दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई

इस खबर को सुनें

दारुबंदी कायद्याअन्वये सेलू पोलीसांची कारवाई


सेलू (प्रती)सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत जामणी पारधी बेडा येथे काही ईसम व महीला हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असून तसेच गावठी मोहा दारुच्या हातभट्टी करिता लागणारा कच्चा मोहा रसायन सडवा तयार करिता आहे अशी मुखबीरकडून खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टापसह मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर आरोपी नामे श्रीमती सोनु संजित भोसले ही हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आली तसेच गुड्डु बंडु पवार, अब्बास श्यामलाल पवार, व जयशिला प्रविण पवार हे गावठी मोहा दारु करिता कच्चा मोहा रसायन सडवा तयार करतांना मिळून आल्याने सदर आरोपीतांचे ताब्यातून मौक्यावर 21 लाहन मोठ्या ड्रम मध्ये कच्चा व उकळता मोहा रसायन सडवा 3200 लीटर, गावठी मोहाद दारु 40 लीटर व गावठी मोहा दारु हातभट्टी साठी लागणारे ईतर साहीत्य असा एकूण जु.कि. 3,58,100/- रु. चा माल मिळून आल्याने मौक्यावर नाश करण्यात आला असून आरोपी नामे क्र. 1 श्रीमती सोनु संजित भोसले, क्र. 2 गुड्डु बंडु पवार, क्र. 3 अब्बास श्यामलाल पवार, क्र. 4 जयशिला प्रविण पवार सर्व रा. जामणी पारधी बेडा, ता. सेलू, जि.वर्धा यांचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे कलम 65 बी,सि.एफ. व 65 एफ मदाका अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सपोनि. तिरुपती राणे पो.स्टे सेलू पोलीस अंमलदार गणेश राऊत, रविंद्र रघटाटे, शरद इंगोले, तुषार भुते, अखिलेश गव्हाणे, अमर लाखे, विक्रम काळमेघ, मंगेश राऊत, ज्ञानदेव वनवे, दिनेश चव्हाण, कृष्णा माने, अनिकेत कोल्हे, महिला अमंलदार शेख रुकसाना यांनी केली.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now