*इंडिया* नावावरून जे चालविले आहे ते शहाणपणाचे नाही,- ई.झेड.खोब्रागडे

इस खबर को सुनें

साहेबांचे मत
*नाम गुम हो जायेगा*

*इंडिया* शब्दाचा उपयोग करू नये असे सांगणारे RSS चे प्रमुख यांनी *भारत* शब्दाचाच उपयोग करावा असे म्हटले आहे. त्यांनी असे ही सांगावे की *हिंदुस्थान* या शब्दाचा उपयोग अजिबात करू नये. *भारत म्हणजे इंडिया म्हणजे भारत, राज्यांचा संघ* ,या शब्दाशी सर्व भारतीयांना प्रेम आहे. पूर्ण विचारांती , संविधान सभेने देशाला हे नाव दिले आहे..इतकी वर्षे इंडिया नावामुळे कोणतीही समस्या निर्माण झाली नाही. इंग्रजी मध्ये इंडिया शब्दाचा वापर होतो. परदेशात आपली ओळख इंडियन म्हणून आहे. भारत -इंडिया एकाच अर्थाचे नाव आहेत. ही नावे घेताना स्वाभिमानी वाटते. सत्ताधाऱ्यांकडून असे मुद्धे विनाकारण उपस्थित केले जातात. हा राजकीय खेळ सर्वसामान्यांचे सन्मानपूर्वक जगण्याचे विषय बाजूला करण्यासाठी खेळला जातो.

2. आम्ही सुचवू इच्छितो की, भारताचे नागरिक म्हणून RSS ने त्यांचे मुख्यालय व देशभऱ्यातील RSS च्या कार्यालयात संविधान दिवस 26 नोव्हेंबर ला साजरा करून देशाप्रति समर्पित असल्याचे दाखवून द्यावे. *:संविधान के 75 साल : संविधानाचा अमृत महोत्सव* 2023-25 : *घर घर संविधान*:साजरा करावा भारतीयत्व- नागरिकत्व संविधानाने दिले आहे. हे आपले राष्ट्रीयत्व आहे. तेव्हा , भारताच्या संविधानाचा सन्मान करणे भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. RSS या शब्दात R म्हणजे राष्ट्रीय. मात्र राष्ट्रीय भावना दिसून येण्यासाठी, प्रत्यक्ष वर्तनासाठी ,व संविधानिक कार्यासाठी , राष्ट्रीय हे नाव बदलून *भारतीय* हे नाव ठेवायला काय हरकत आहे?. RSS चे BSS होईल.

3. भारताच्या संविधानाच्या प्रति आणि संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रति , काँग्रेस प्रति, असलेला दुष्टभाव अनेक प्रसंगी सत्ताधारी व सहकारी व्यक्त करतांना दिसतात. द्वेषाने द्वेष वाढतो व यामुळे राष्ट्रीय एकता व एकात्मता वृडिंगत करणारी बंधुतेची भावना क्षीण होते. नाव बदलण्याच्या नादात,*नाम गुम हो जायेगा*, असे मला वाटते. संविधानात फार मोठी शक्ती आहे. संविधानाने दिलेल्या शक्तीचा चांगला व चांगल्यासाठी , जनकल्याणासाठी वापर झाला पाहिजे. सार्वभौम भारताचे लोक हे सार्वभौम आहेत. अशा 140 कोटी लोकांचे हे संविधान आहे. सत्ता आहे म्हणून काही ही करा हे जसे असंविधानिक आहे तसे अनैतिक सुद्धा आहे.तेव्हा संविधानाशी छेडछाड करणार्यांना लोकच शिक्षा देतील, शक्तीहीन करतील. लोक सुज्ञ आहेत.

4. भारताचा नागरिक म्हणून , मला वाटते की या सरकारने *इंडिया* नावावरून जे चालविले आहे ते शहाणपणाचे नाही अविवेकी आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या ध्येय व उद्धिष्ट च्या ठरावावर , दि 17 डिसेंबर1946ला, संविधान सभेत बोलताना म्हणाले होते की ,*सत्ता देणे सोपे आहे परंतु शहाणपण देणे महाकठीण*. ज्यांच्याकडे निर्विवाद सत्ता आहे त्यांनी शहाणपणाने, विवेकाने, सूज्ञपणे वागले पाहिजे. भारत देशाला एकात्म ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

इ झेड खोब्रागडे, भाप्रसे नि
संविधान फौंडेशन नागपूर
दि 6 सप्टेंबर2023।

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now