अकोला जिल्ह्यात बौद्ध महिला भगिनीवर समाजकंटकांनी केला अन्याय-अत्याचार! पाच महिला गंभीर !

इस खबर को सुनें

अकोला जिल्ह्यात बौद्ध महिला भगिनीवर समाजकंटकांनी केला अन्याय-अत्याचार!
पाच महिला गंभीर 

रिपाइं (ए) व आंबेडकरी संघटनाकडून तीव्र निषेध!

“वाईट परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील !” :- महेंद्र मुनेश्वर

वर्धा (गुरुवार): ७ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्राला हादरवणारी व्हदयद्रावक घटना काल अकोला जिल्ह्यातील,सांगवी मोहाडी या गावामध्ये घडली.या ठिकाणी अनुसूचित जातीच्या बौद्ध समाजावर संवर्ण समाजकंटकांनी घरात घुसून हमला केला.त्या समाजकंटकांनी जातीवाचक शिवीगाळ करून महिला भगिनींचा विनयभंग करुन कुराडीने मारहाण केली.भीम सैनिक महिला भगिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.आरोपी विरुद्ध लवकरात लवकर एट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून मोकाट समाजकंटकांना त्वरित अटक करावी.अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाइं (ए) विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर व समस्त कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी दिला आहे.

समाजकंटांनी घरात घुसून पीडितांवर कुराड, लोखंडी रॉड, व लाथा बुक्यानी जबर मारहाण केली.यामध्ये पाच महिला भगिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे.येवढेच नाही तर एका महिलेच्या डोक्यावर कुराडीने जबर वार करण्यात आला आहे.तसेच तीन महिला गंभीररीत्या जखमी असून एकुन पाच महिला भगिनी रुग्णालयात भरती आहेत. महाराष्ट्र सरकारने व पोलिसांनी जर या गंभीर घटनेची दखल घेतली नाही व आरोपी समाजकंटकांनावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी दिला आहे.या घटनेच्या निषेधार्थ रिपाइं (आंबेडकर) व विदर्भातील अनेक आंबेडकरी संघटना निषेध व्यक्त करीतआहेअसेही मुनेश्र्वर म्हणाले.
आरोपी समाजकंटकांना अभयदान देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे – उपमुख्यमंत्री व गृहमंत्री फडणविस सरकार व पोलिसांनी केल्यास त्याचे वाईट परिणाम महाराष्ट्र राज्य सरकारला भोगावे लागतील असे सुध्दा रिपाइं (ए) विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर म्हणाले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now