वर्धेत आमदाराने कार्यकर्त्यांना हरामखोर असे संबोधल्याने राजकारण

इस खबर को सुनें

वर्धेत आमदाराने कार्यकर्त्यांना हरामखोर असे संबोधल्याने राजकारण

_______________________________________
माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी केली कारवाईची मागणी.

 

_____________________________________

वर्धा(मंगेश चोरे) हल्लीच वर्धा येथील आमदार पंकज भोयर यांनी बोलतांना काही हरामखोर नागपुरला जातात.असे संबोधले यावरून वर्धा येथिल भा.ज. प पक्षातील काही नेत्यांनी त्याचा विपर्यास करून राजकारण करायला सुरुवात  केली.यात आज माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे यांनी आमदारावर कारवाईची मागणी केली.याउलट मोठे नेते दाखल घेत नाही असाही आरोप करत आपण.जिल्ह्यात फिरून समस्त कार्यकर्त्यांना भेटुन कारवाई करिता पुढाकार घेतलेला आहे असे स्पष्ट केले.वास्तविक बघीले तर या भानगडीला नक्की काय समजावे?हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर काही भा.ज प नेते मात्र केवळ गप्प बसुन दिसते.वास्तविक आमदार पंकज भोयर यांनी हरामखोर हा शब्दप्रयोग केला असला तरी त्यांनी नक्की कुणाला म्हटले हे काही स्पष्ट नाही. आणी त्यांनी वाघमारे यांना उद्देशून हे शब्द वापरलेले नाही.हे सुध्दा तेवढेच खरे आहे.मग वाघमारे यांनीच हा पवित्रा का घेतला ? या संदर्भात मात्र आता चर्चा सुरू झाली आहे.वास्तविक आमदार पंकज भोयर हे मुळात भा.ज. प अथवा संघाचे नाही.परंतु हे दोन वेळा पक्षात आमदार झाले.त्यांनी आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घेत.मतदार संघ काबीज केला.अनेक कामे केली.आता यांची जागा रिकामी होणे दिसत नाही. आणी या जागेवर दावा करायला काही जागा मिळत नाही.यामुळे अनेक नेते खाली बसुन आहेत.याची मनात खदखद अनेकांना आहेतच यातच हरामखोर हा शब्द प्रयोग वातावरण निर्मिती करण्या करिता योग्य ठरू शकतो.याचा अचूक अभ्यास करून.हे राजकारण उभे करण्यात तर नाही ना आले? या वर सुध्दा चागलीच चर्चा रंगू लागली आहे.आगामी निवडणुका येण्यापूर्वी जिल्ह्यात अनेक घडामोडी होणार असल्या तरी.जर भा. ज. प पक्षाकडून आमदार पंकज भोयर यांना उमेदवारी न देता.ही उमेदवारी वाघमारे यांना दिली.तरी पंकज भोयर हे वर्धा विधानसभेचे आमदार असेल. असे जनतेचे मत व्यक्त होताना दिसते. वास्तविक मुळात पंकज भोयर हे.काँग्रेस पक्षातून भा.ज प पक्षात आले. आणी पुढे परत गेले तरी त्यांना उमेदवारी मिळेल यात शंका नाही.दुसरी बाब जातीचे समीकरण. आणी त्यांची वैयक्तिक मते. आणी भा.ज.प पक्षावर असलेली नाराजी यातुन मोठी हानी ही भा.ज.प पक्षाची होणार याचा विचार करून.कदाचित मोठ्या नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली नसावी.परंतु माजी खासदार यांनी घेतलेल्या भूमिकेला किती प्रतिसाद मिळतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now