अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातुन हिंगणघाट येथे नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचा जाहीर निषेध!

इस खबर को सुनें

अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातुन हिंगणघाट येथे नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचा जाहीर निषेध

रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री यांना जिल्हाधकाऱ्यांमार्फत निवेदन!

जिल्हा प्रतिनिधी

अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा शहरातुन हिंगणघाट येथे नेण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या लोकप्रतिनिधी व राज्य सरकारचा जाहीर निषेध करुन आज बुधवार २७ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य सचिवालय-मुंबई यांना जिल्हाधकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले आहे.वर्धा जिल्ह्यातील गरीब,सामान्य नागरिकांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वर्धा येथे व्हावे अशी रास्त मागणी आहे.परंतु वर्धा येथे मंजुर झालेले अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट येथे हलविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेऊ नये, घेतल्यास राज्य सरकार विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तीव्र आंदोलन करेल असा इशारा विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी निवेदनातून दिला आहे.
महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांनी भारत देशाच्या स्वातंत्र लढ्याचे आंदोलन सेवाग्राम,वर्धा,पवनार येथून चालविले.याच भूमीत वर्धा येथे अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे असे विचार अनेक पुरोगामी संघटना व सेवाभावी संस्था यांनी शासन स्तरावर मांडले आहे.त्यामुळे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे नेण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकारण्यांनी करु नये.राज्य सरकारने मंजुर असलेल्या सदरहू अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात लबाडपणाचे राजकारण करुन जनतेची दिशाभूल करु नये.
वर्धा जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणुन जगात ओळख आहे.वर्धा शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे.येथे आजच्या काळात शोषित,पिडीत,वंचित,गरीब कष्टकरी,शेतकरी,कामगार व सामान्य रुग्णांना कुठेही मोफत वैद्यकीय सेवा व डॉक्टर तसेच औषधोपचार मिळत नाही.त्यामुळे वर्धा शहरातच अत्याधुनिक सेवा देणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे.असे सामान्य जनतेचे स्वप्न आहे.
महाराष्ट्र शासना मार्फत वर्धा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नविन अत्याधुनिक इमारतीच्या जागेला शासन स्तरावर मंजुरी आहे,इमारतीच्या बांधकामाची जागा सुध्दा वर्धा येथेच अधिग्रहित करण्यात आली आहे.परंतु येथिल पालकमंत्री व काही भाजप चे स्थानिक आमदार,खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रतनिधी वगैरे अशी बरीच मंडळी स्वार्थाने स्वतःचे राजकारण करण्यासाठी सामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे.वर्धा येथे मंजुर झालेले अत्याधुनिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे नेण्याचा प्रयत्न यापुढे स्थानिक आमदार व लोकप्रतनिधींनी करु नये.यात राज्यातील सत्ताधारी भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस सरकार सावळागोंधळ करित आहे.त्यामुळे आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे तीव्र निषेध करुन पुढे वर्धा येथे तीव्र आंदोलन करणार आहोत.आंदोलनातून झालेल्या हानीचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील.असे रिपाइं (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर व विदर्भ प्रदेश संघटक मंगेश चोरे,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष सतीश इंगळे,युवा आघाडी जिल्हा सचिव अंकित रामटेके,जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र थूल,बंडू फुलमाळी,वर्धा विधानसभा अध्यक्ष रुपेश नागदिवे,जिल्हा महासचिव सुधीर सहारे, जिल्हा सचिव सुभाष कांबळे, सुशांत लाखे,संदेश दहाट, शुभम कांबळे,मनोज गावंडे, शुभम सायंकार,अनिस पठाण, वर्धा तालुका अध्यक्ष सुनील वनकर,राजू भगत, वर्धा तालुका सचिव सुरेश आगलावे,राहुल वाघमारे, संजय देशमुख,गोवर्धन नगराळे,जयकांत पाटील, अरविंद भगत,प्रकाश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष,राजू थूल, सुनील हंबर्डे,किशोर फुसाटे, प्रवीण पोळके,धीरज मेश्राम, रंजन कांबळे,पुरुषोत्तम भगत, आदी रिपाइं (आंबेडकर) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदनातून कळविले असुन महाराष्ट्र शासन व भाजपा – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकार व स्थानिक आमदार,खासदार यांचा जाहीर निषेध नोंदविला आहे.

 

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now