नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतील विनयभंगाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक . अवचितराव सयाम

इस खबर को सुनें

नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतील विनयभंगाची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक .

अवचितराव सायाम
********************

जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील नवजीवन आदिवासी आश्रमशाळेतील कोवळ्या वयातील मुलीसोबत झालेल्या विनयभंगाच्या घटनेची सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत आदिवासी नेते अवचितराव सयाम यांनी व्यक्त केले.

नुकतेच कारंजा घाडगे तालुक्यातील नारा येथिल आदिवासी आश्रमशाळेत कोवळ्या मुलाच्या मृत्युचे प्रकरण अगदी ताजे असतांना देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील आदिवासी आश्रमशाळेत पाचव्या वर्गाच्या कोवळ्या मुलीसोबत तेथील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्या कडुन छेडछाड ,असभ्य वर्तणुक, विनयभंगा सारखा घृणीत गुन्हा घडतो. हे दुदैव आदिवासी समाजाच्या गरीब ,शोषीत मुलामुलींच्याच नशीबी का बरे वारंवार येते ,ही मोठी सामाजिक शोकांतिका असल्याचे ते म्हणालेत .

कारंजा घाडगे तालुक्यातील नारा व देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथील आश्रमशाळांना राजकिय वरदहस्त प्राप्त असल्याने कोणत्याही तक्रारीची शासन दरबारी दखल घेतल्या जात नाही अशी पंचक्रोशीत चर्चा आहे .

या नवजीवन आश्रमशाळेत एकुण 81 मुलेमुली निवासी राहुन शिक्षण घेतात व त्यांच्या संगोपनासाठी व शिकविण्यासाठी एकुण 21 कर्मचारी व शिक्षकाचा संच आहे. आश्रमशाळेत पुरुष अधिक्षक हे पद रिक्त असल्याने मुख्याध्यापिकेने चार्ज दुसऱ्या शिक्षकास दिला परंतु शाळा व्यवस्थापने तोच अधिक्षक पदाचा चार्ज चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांस दिला. महीला अधिक्षक रजेवर असल्याने मुले व मुली ह्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्याच ताब्यात होत्या. त्याचाच फायदा घेवुन त्याने मुलींसोबत विनयभंग होईल असे कृत्य केल्याचे मुलींनी ,महीला अधिक्षकास सांगीतल्याने मुख्याध्यापिकेच्या आदेशानुसार महीला अधिक्षकेने पोलीस तक्रार केल्याचे समजते.

या प्रकरणात पोलीस यंत्रणे कडुन तपास सुरु आहे .मुलींचे बयान नोंदविले परन्तु वरिष्ठांच्या आदेशानुसार पुन्हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन बयान नोंदविल्याचे समजते.

कार्यरत असलेले कर्मचारी, शिक्षक ,अधिक्षक यांच्यातील आपसी हेवेदावे, मनमुटाव ,आरोप प्रत्यारोप ,ऐकमेकांना ॲट्रोसीटी कायद्याची धमकी अश्यातच कोवळ्या आदिवासी मुलांचे शारीरिक, मानसिक, शैक्षणिक नुकसान ह्या आश्रम शाळेत होत आहे.

विनयभंगाच्या झालेल्या प्रकारात सखोल चौकशी होवुन पाचव्या वर्गात शिकत असलेल्या कोवळ्या मुलींच्या जीवांचे शारीरिक ,मानसिक,व शैक्षणिक भविष्याचे रक्षण होणे गरजेचे आहे .

या आश्रमशाळेत मुलांच्या भोजनासाठी सरकारी अनुदान प्राप्त होत असतांना सुध्दा ते घेतल्या जात नाही ,शिक्षक व कर्मचारी यांच्या वेतनातील वर्गणीतुन हा खर्च भागविल्या जातो . हे मोठे दुदैव आहे .आदिवासी प्रकल्प कार्यालय वर्धेलाच असुन सुध्दा त्यांचे आश्रमशाळेतील कोवळ्या मुलामुलींच्या भविष्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे.हे नारा व कोल्हापूर येथील आश्रमशाळेतील चर्चीत प्रकरणावरुन लक्षात येते ,त्यांच्या ही
कार्याची सखोल चौकशी होणे जरुरीचे आहे.

नवजीवन आश्रमशाळेतील विनयभंगाची सखोल चौकशी करुन दोषी वर कडक कारवाई करावी व कोवळ्या मुलींच्या जीवाचे रक्षण करावे अशी मागणी आदिवासी नेते अवचितराव सयाम यांनी मा. श्री राहुल कार्डीले साहेब जिल्हाधिकारी वर्धा व मा.श्री नरुल हसन साहेब पोलीस अधीक्षक वर्धा यांना केली .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now