राज्यातील ओबीसी ला संघटीत करण्याकरिता भाजप करणार “ओबीसी जागर यात्रा ”

इस खबर को सुनें

 

राज्यातील ओबीसी ला संघटीत करण्याकरिता भाजप करणार “ओबीसी जागर यात्रा
• सुमारे २००० किमी प्रवास करणार हि यात्रा.
• ४४ विधानसभा व ९ लोकसभा क्षेत्रांचा असणार समावेश.
——————————————————–
वर्धा (प्रती)महाराष्ट्रातील ओबीसी घटकाला संघटित करण्याकरिता तसेच त्यांच्या करिता केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा पुरेपूर माहितीचा आलेख सर्वसामान्य जनतेच्या समोर प्रत्यक्षपणे मांडण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने भाजप ओबीसी मोर्चा च्या वतीने ओबीसी जागर यात्रेचे आयोजन पूर्ण महाराष्ट्रात करण्यात येणार आहे यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे दोन हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे त्याचबरोबर या संपूर्ण यात्रेदरम्यान ही यात्रा सुमारे 44 विधानसभा व लोक नऊ लोकसभा क्षेत्रांचा मार्गक्रमण करेल या
या जागर यात्रेचे नेतृत्व ओबीसी मोर्चाची महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आमदार श्री डॉ. आशिष जी देशमुख व ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष श्री संजय जी गाते करणार आहे. तसेच या जागर यात्रेला संपूर्ण मार्गदर्शन हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे करणार आहेत.
या यात्रेच्या दरम्यान केंद्र 9 वर्षातील ओबीसी करिता केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा तसेच प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची विस्तृत माहिती देणारे पत्रक सुमारे दोन लाखाहून अधिक पत्रक सर्वसामान्य जनतेमध्ये वितरित करण्यात येणार आहेत. या यात्रेच्या शुभारंभ वर्धेतील नगाजी महाराजांचे श्रीक्षेत्र परडी येथून करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे या यात्रेच्या शुभारंभ या यात्रेचा शुभारंभ करण्याकरिता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री हंसराज अहिर माजी खासदार माननीय खासदार श्री संगम लालजी गुप्ता, वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री रामदासजी तडस तसेच वर्धा जिल्ह्यातील सर्व माननीय विधानसभा व विधानपरिषद आमदार व भाजप जिल्हाध्यक्ष श्री सुनील जी गफाट उपस्थित राहणार आहे. या यात्रेचा समारोप श्री क्षेत्र पोहरादेवी जिल्हा वाशिम येथे करण्यात येणार आहे.
या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे , भागवत जी कराड, अतुल जी सावे, ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री डॉ के लक्ष्मण व विदर्भातील सर्व माननीय आमदार व खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार माध्यमातून ओबीसीन करिता राबविण्यात येणाऱ्या या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त घेऊन या जागर यात्रेमध्ये सामील होण्याचे आवाहन भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी केले या वेळी पत्रकार परिषदेला वर्धेचे खासदार श्री रामदास तडस वर्धेचे आमदार डॉ पंकज भोयर भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे शहराध्यक्ष निलेश पोहेकर उपस्थित होते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now