दहेगाव (गोसावी)येथे युवतीची घरात घुसून हत्या .

इस खबर को सुनें

  दहेगाव (गोसावी)येथे युवतीची घरात घुसून हत्या


(केळझर प्रती) वर्धा नागपूर महामार्गावरील केळझर नजीकच्या दहेगाव गोसावी येथे वर्धा येथील दोन युवक युवतींनी घरात घुसून  हत्या केली. अंकिता सतीश बाईलबोडे असे मृतक युवतीचे नाव असून काल रात्री गांधी जयंतीच्या दिवशी आठ वाजताच्या दरम्यान वर्धा येथून दोन बाईक वरून दोन युवक आणि दोन युवती अशा चार लोकांनी दहेगाव येथे जाऊन सतीश बाईलबोडे यांचे घर विचारले. घरी जाऊन अंकिता घराच्या बाहेर येतात तिच्यावर शस्त्राने वार करून जखमी केले. परिसरात आरडाओरडा झाल्याने जमावाने पळत असलेल्या मारेकऱ्यांना पकडण्याचा  प्रयत्न केला. यावेळी संपूर्ण मारेकरी हे पळण्यात यशस्वी झाले .नजीकच्या दहेगाव पोलीस स्टेशनला माहिती देऊन पोलीस सक्रिय झाले .तसेच गावकऱ्यांनी पाठलाग केल्याने नजीकच्या जुनोना गावात आरोपींना पकडण्यात आले. यावेळी हे वर्धा येथील रहिवासी असल्याचे उघड झाले सदरची घटना का व कशासाठी झाली याचा तपास दहेगाव पोलीस करीत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now