प्रगतीशीलता मानवाची मूळ प्रवृत्ती राहिली आहे .!   विभूती नारायण राय

इस खबर को सुनें

प्रगतीशीलता मानवाची मूळ प्रवृत्ती राहिली आहे !                                                      विभूती नारायण राय

वर्धा (प्रतिनिधी )  :  मानव एका ठिकाणी  स्थिर  राहू शकत नाही तसाच तो कोणतीही एकच स्थितीत  कायम जगू शकत नाही परिस्थितीवर मात करणे हा त्याचा मूळ स्वभाव आहे म्हणुनच तो प्रगतीशील ठरतो असे प्रतिपादन माजी कुलगुरू म गांधी हिंदी विद्यापीठ तसेच प्रगतिशील लेखक संघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष  विभूती  नारायण राय यांनी केले .                                  ते निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्क सभागृहात आयोजित वर्धा प्रलेसच्या कार्यक्रमात बोलत होते . यावेळी प्रलेसचे राष्ट्रीय सचिव प्रेमचंद गांधी ,डॉ. सतीश पावडे ,  मुरलीधर बेलखोडे, वर्धा प्रलेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंढे .यांची प्रमुख उपस्थिती होती .                         प्रगतिशील लेखक संघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष  झाल्या नन्तर प्रथम आगमन निमित्त  विभूती  नारायण राय यांचे व  राष्ट्रीय सचिव प्रेमचंद गांधी  या द्वयांचा  डॉ राजेंद्र मुन्ढे यांच्या हस्ते  शाल , पुस्तके व सुतमाला देऊन सत्कार करण्यात आला . त्यांनी संघटनेच्या  कार्यकर्त्यांशी संवाद साधला.   यावेळी इंग्रजीत अनुवादित  ग्रामगीता विभूती नारायण राय यांना भेट देण्यात आली .दामोदर राऊत यांनी वैष्णव जन महात्मा गांधीचं आवडतं गीत प्रस्तुत केले बा दे हांडे यांनी सामुदायिक प्रार्थना घेऊन जय घोष घेतलं. डॉ. राजेंद्र मुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन केले.तर आभार निसर्ग सेवा समितीचे मुरलीधर बेलखोडे यांनी मानले.
डॉ. अमित कुमार विश्वास, डॉ सतीश पावडे, राजेश कुमार यादव , प्रकाश येंडे, कवी प्रशांत पनवेलकर , दामोदर राऊत, विजय भगत,  बा.दे .हांडे, रमेश भोले , बाबुराव भोयर , उल्हास लोहकरे , यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now