इस खबर को सुनें

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) पक्षात अनेक ओ बी सी बांधवांचा पक्ष प्रवेश

वर्धा: जिल्हा प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष व लोक नेते मा.दिपक भाऊ निकाळजे यांच्या निर्देशाने चंद्रपूर येथील कार्यकर्ता मेळाव्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील अनेक ओबीसी बांधवांनी पक्षाचे राष्ट्रीय महासचिव माननीय मोहनलाल पाटील यांच्या उपस्थितीत पक्षाचे विदर्भ अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर विदर्भ संघटक मंगेश चौरे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्त्यांसह प्रशांत पांडे,कृष्णरावजी मूते,समीर कावळे, मारोतराव कुबडे,यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह रिपाइं (ए) मध्ये प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांनी रिपाइं आंबेडकर पक्षात प्रवेश घेणाऱ्या ओबीसी कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. पुढील काळात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित असलेल्या अनेक ओबीसी बांधवांसाठी आर पी आय (ए) पक्षाची दारे खुली असल्याचे ही निकाळजे यांनी व्यक्त केले आहे.समता बंधुत्व अखंडित ठेवायची असेल तर आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचाच स्वीकार करावा लागेल.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) हा पक्ष सर्व जाती समावेशक पक्ष असून.अन्याय अत्याचाराच्या विरोधात सदैव झटत असणारा पक्ष असल्याने अनेक ओबीसी बांधवांनी एकत्रित येणे गरजेचे असल्याचे ही ते म्हणाले.
नवनियुक्त कार्यकर्त्यांना लवकरच पुढील काळात जबाबदारीचे पद देऊन पदे देऊन रिपाइं पक्ष गतिमान करण्याची जबाबदारी लवकरच ओबीसी कार्यकर्त्यांवर सोपविण्यात येईल असे राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील म्हणाले. यावेळी विदर्भ प्रदेश महिला अध्यक्षा प्रियाताई खाडे,सुभाष कांबळे,तालुका अध्यक्ष सुनील वनकर,जिल्हा युवा आघाडी अध्यक्ष सतीश इंगळे,जिल्हा युवा आघाडी सचिव अंकित रामटेके,धीरज मेश्राम,चेतन कांबळे,पुरुषोत्तम कळणे,महाराष्ट्र प्रदेश चे सचिव.राजेंद्र आठवले , कुवरलाल रामटेके,तसेच विदर्भ प्रदेश चे महासचिव भीमराव डोंगरे, पश्चिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष संतोष इंगळे,पुर्व विदर्भ प्रदेश अध्यक्ष आर.एस.वानखेडे,नागपूर जिल्हा अध्यक्ष दुर्वास चौधरी,अमोल वानखेडे, यु एन बोरकर,विदर्भ प्रदेश आयटी सेल अध्यक्ष सारंग जीवने, विजय लांजेवार,गुप्तमन्नू मेश्राम,दिनेश बागडे आदी नेत्याची उपस्थिती होती.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now