ऐक कोटीचे कमिशन मागणारा तो नेता कोण…? वर्धा शहरात चर्चा.

इस खबर को सुनें

*.    कमिशन मागणाऱ्या त्या नेत्याची वरात गेली         लाचलुचपत   विभागात नागपुरला.
*.     जिकडून तिकडून दबाव आला.नेत्याला दिले सोडुन….
तकार करण्यास सांगणारा ही बडा नेता, आणि सोडणारा ही बडा नेता..
*.      यावरून कमिशन खोर नेत्यांना काय संदेश असावा…?

 

वर्धा (प्रती)

वर्धा येथील ऐका नेत्यावर ठेकेदाराला कोटी रुपयाचे कमिशन मागितल्याचा मामला रविवारी नागपुर येथे रितसर लाचलुचपत विभागाने दाखल केला. यात काही सबळ पुरावे असल्याने नागपुर , वर्धा येथील काही अधिकारी तपासणीला आले.विचारपूस करून त्या नेत्याला नागपुर येथे घेऊन गेले.मात्र राजकीय दबाव आला आणि मामला दाबला गेला.आणी त्या नेत्याला मोकळे सोडले .या प्रकरणात मात्र प्रमाणिक अधिकाऱ्याची बदली केली गेली. यामुळे अधिकारी वर्गात संताप निर्माण झाल्याचे दिसते. हरामखोरांची साथ आणी प्रामाणिक अधिकाऱ्यांना लाथ. असा प्रकार सुरू असल्याने प्रमाणिक अधिकारी त्रस्त आहेत.
हल्ली जलजिवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या पाईप लाईन चे काम केले जात आहे. या करोडो रुपयाच्या कामात ऐक कोटी रुपयाचे कमिशन वर्धा येथील ऐका नेत्याने मागितल्याचा मामला उजागर झाला.ठेकेदाराला नागपुरातून त्यांच्याच पक्षातील बड्या नेत्यानेच लाचलुचपत विभागाला तक्रार देण्यास प्रोत्साहित करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.यामुळे ही तक्रार नागपूरच्या लाचलुचपत विभागाला दाखल करण्यात आली.रविवारी नागपुर व वर्धा येथील अधिकाऱ्यांनी त्या नेत्याचे घर गाठले .प्रकरणात सत्यता असल्याने त्या नेत्याला नागपुर येथे नेले गेले. मामला दूर वर माहीत झाला. अधिकारी वर्गावर दबाव निर्माण करण्यात आला. आणी रातोरात त्या नेत्याला सोडले गेले. सगळीकडे चर्चा होतीच मात्र दुसऱ्या दिवशी नेता “मी नाही त्यातली” या आविर्भावात गावभर दसऱ्या निमित्याने लोकांच्या भेटी गाठी घेत होता. हल्ली वर्धा येथे बेकायदेशिररित्या अनेक कामे केली गेली.यात अनेकांचे मामले न्यायालयात दाखल होऊ लागले आहे.बांधकाम विभागात सगळा अनागोंदी कारभार सुरू असून.याच नेत्याच्या मर्जीने ठेकेदारांना कामे दिली जाते.हे कुणाला सांगण्याची गरज नाही.हल्ली या विषयात मोठी चर्चा शहरात सुरू आहे.तर अनेकांच्या तोंडून एकच सुर हा नेता कोण…? या प्रकरणावरून या नेत्याची पायली भरली हे स्पष्ट होत असून.कोणत्या वेळी कमविले तितके गमविण्याची पाळी येईल सांगता येत नाही.आज जरी वाचविले असेल तरी ही पहिली सूचना होती असे दिसते… पुढे या नेत्याला सावध पवित्रा घेण्याची गरज असल्याचे चित्र आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now