जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ऑफ्रोह’चे नारे निदर्शने करून आंदोलन

इस खबर को सुनें

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘ऑफ्रोह’चे नारे निदर्शने करून आंदोल
.वर्धा .(प्रतिनिधी):
जळगाव येथे आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनाला पाठिंबा, 14डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयाचे शुद्धीपत्रक व मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ हुयमन शाखा वर्धा. वतीने च्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले

आदिवासी महादेव कोळी,टोकरे कोळी,मल्हार कोळी,ढोर कोळी यांचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावेत, या मागण्यांसाठी जळगाव येथे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे.
जात प्रमाणपत्र तपासणी समितीचे सनदी अधिकारी डाॅ.गोविंद गारे, व माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या जन्मनोंदी या ‘कोळी’ आहेत. तर नगरमधील राहूरी,संगमनेर, अकोले,पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, नारायणगाव,भिमाशंकर ,
मावळ भागात ‘कोळी’च नोंदी आहेत. त्यांना ज्या निकषाने महादेव कोळी या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधताप्रमाणपत्र दिले जाते. त्याप्रमाणे राज्यातील उर्वरीत भागातील कोळी नोंद असणा-या समुहांना महादेव कोळी,टोकरे कोळी,मल्हार कोळी,ढोर कोळी चे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समितीने आमरण अन्नत्याग सत्याग्रह सुरू केले आहे.
जळगाव येथे कोळी समन्वय समितीच्या वतीने दि.१०ऑक्टोबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 8 कोळी बंधू भगिनींनी सुरू केलेल्या आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाला समर्थन देण्यासाठी ,अधिसंख्य पदाच्या सेवालाभ /सेवानिवृत्तीविषयक लाभाच्या दि.14/12/2022 च्या शासन निर्णयात तृटी असल्याने त्याचे शुद्धीपत्रक काढण्यात यावे.तसेच
मुंबई महानगरपालिका व बेस्टच्या सेवानिवृत्त व कार्यरत अधिकारी- कर्मचा-यांना सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ मिळण्यासाठी ऑफ्रोह ठाणेच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला समर्थन व शासनाला पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यासाठी ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ हुयमनच्या वतीने  महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नारे निदर्शने आंदोलन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऑफ्रोह शाखा. वर्धा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी अन्यायग्रस्त आदिवासींनी तसेच ऑफ्रोहच्या सभासदांनी या आंदोलनात सहभागी व्हावे,असे आवाहन ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष
.श्री अशोक वी हेडा ऊ….
जिल्हा सचिव
श्री डॉ प्रकाश एल भिसे कर.
श्री डॉ गजानन भो बाटे
संघटक
श्री अनिल एम परा ते कोशाध्यक्ष
यांनी केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now