देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजितदादा कांबळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व* : *रिपाइं (ए) जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांचे प्रतिपादन*

इस खबर को सुनें

*देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार रणजितदादा कांबळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व* :
*रिपाइं (ए) जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांचे प्रतिपादन

*आमदार रणजितदादा कांबळे यांच्या हस्ते म्हाडा कॉलनी व बरबडी येथील सिमेंट काँक्रिट रहदारी रस्ता व सभागृह बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न*

वर्धा :
ग्रामीण भागातून अनेक राजकीय नेते तयार होतात.परंतु काही पुढाऱ्यांना ग्रामीण भागातील विकासाची तळमळ दिसत नाही.त्यांचा कल शहरा कडे दिसतो.त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास साधण्यात सामान्य जनतेला अनेक अडचणी येत असतात.परंतु ग्रामीण भागाची नाळ जुळलेला नेता म्हणुन आमदार रणजितदादा कांबळे यांची ओळख आहे.देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणुन रणजितदादा यांच्या सोबत आमच्या एमआयडीसी म्हाडा कॉलनी बरबडी येथिल जनतेची नाळ विकास कामांमुळेच जुळली आहे.ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणुन २५ वर्षा पासुन देवळी-पुलगाव विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार व राज्याचे भूतपूर्व मंत्री म्हणुन रणजितदादा कांबळे यांची ओळख आहे.असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे वर्धा जिल्हा अध्यक्ष व म्हाडा कॉलनी एमआयडीसी वार्ड क्रमांक ४,बरबडी येथिल ग्रामपंचायतचे सदस्य महेंद्र मुनेश्वर यांनी आज दिनांक ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता आमदार रणजित कांबळे यांच्या हस्ते म्हाडा कॉलनी एमआयडीसी,बरबडी येथील सिमेंट काँक्रिट रोड व बरबडी येथिल सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी केले .

यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने ग्रां.पं.बरबडीच्या सरपंच श्रीमती संगीताताई शिंदे,उपसरपंच मदन धमाणे, ग्रा. पं सदस्य सुलोचनाताई अनकर, गीरडेताई,प्रज्ञाताई झामरे तसेच मनिषाताई गोसेवाडे,माजी ग्रामपंचायत सदस्य रत्नमालाताई मुनेश्वर,संध्याताई पाटील,पुष्पाताई अश्र्वघोष,रिनाताई बारसागडे,पद्ममा दारुंडेताई,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पांडुरंग देशमुख,बाळाभाऊ जगताप,माजी पं.सं.सदस्य कमलाकर शेंडे,माजी पं.स.सदस्य अमित शेंडे,पंकज सोनटक्के,प्रभाकर पाटील,कवडू दारोंडे,रक्षित अश्र्वघोष,पवण गोसेवाडे,सुधाकर धनविज,बाबाराव वानखेडे,पंकज गोटेकर,संजय काकडे,गजानन शिंदे,सुनिल कोल्हे,सुभाष खुजनारे,बाबाराव चरडे,शफी सय्यद,सुनिल ढोले,शुभम नंदुरकर,प्रविण झामरे,समिर सय्यद, मंगेश थूल,वैभव बहादुरे,तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि म्हाडा कॉलनी एमआयडीसी बरबडी आदींची उपस्थिती होती.अंगणवाडी सेविका व मदतनीस तथा ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.आभार ग्रामविस्तार अधिकारी गोपाळ दासलवार यांनी मानले.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now