पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन!

इस खबर को सुनें

पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील पेट्रोल पंप पोलीस प्रशासनाने त्वरित स्थलांतरित करावा !

न्यायालयाचा अवमान करुन पेट्रोल पंप चे पुनश्च बांधकाम सुरु करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा तीव्र निषेध !

 

वर्धा: (प्रतिनिधी)

वर्धा शहरातील सिव्हिल लाईन येथिल स्थळी सविंधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व पोलिस वेल्फेअर विभागाच्या पेट्रोल पंप चे बंद असलेले बांधकाम पुनश्च हेतुपुस्सर सूडबुद्धीने सुरु आहे.यामुळे आंबेडकरी जनता तीव्र आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहे.पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे आंबेडकरी जनतेने स्वातंत्रदिनी केलेल्या जनआंदोलन व आक्रोश मोर्चाची पुढे पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन राज्य सरकार जिल्ह्याचे पालकमंत्री,स्थानिक खासदार व आमदार तसेच जिल्हाधिकारी प्रशासनाने दक्षता घ्यावी.सदरहू पेट्रोल पंपच्या बांधकामाचा विषय न्याय प्रविष्ट असताना सुध्दा जिल्हा पोलिस अधीक्षक व पोलिस वेल्फेअर विभागाने सूडबुद्धीने न्यायालयाचा अवमान केला आहे.असा आरोप पेट्रोल पंप हटाव कृती समितीचे निमंत्रक महेंद्र मुनेश्वर व समन्वयक सदस्य निरज गुजर,विशाल मानकर,किशोर खैरकर,मोहन राईकवार,अरविंद नकोसे,अरविंद खैरकार,आशिष सोनटक्के,सतीश इंगळे,अमित देशभ्रतार,कपिल चंदनखेडे,धर्मपाल शंभरकर,चिंतामण बुरबुरे,नितीन इंदुरकर,वसंत भगत,विशाल नगराळे,शारदाताई झांबरे,मेजर ढोबळे,अनिल इंगळे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे आंबेडकरी जनतेने स्वातंत्रदिनी केलेल्या जनआंदोलन व आक्रोश मोर्चाची पुढे पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी.संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळील हिंदुस्थान पेट्रोलियम चा पेट्रोल पंप जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने स्थलांतरित केला नाही तर वर्धा शहरातील आंबेडकरी समाजाचे पुढील जन आंदोलन अधिक तिव्र असेल,या आक्रोश जन आंदोलनाचे लोण महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारत देशात पोहचेल.यातुन होणाऱ्या हानीला केंद्र व राज्य सरकार जबाबदार राहील.सरकार व प्रशासनाने आंबेडकरी समाजाची अस्मिता जपावी.असेही समितीचे निमंत्रक महेंद्र मुनेश्वर म्हणाले.
पेट्रोल पंप हटाव कृती समिती तर्फे संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे स्वरक्षण करण्यासाठी व पोलीस प्रशासनाचा पेट्रोल पंप स्थलांतरित करण्यासाठी आंबेडकरी समाज एकसंघपणे लोकशाही मार्गाने पुढील जन आंदोलनाची दिशा लवकरच ठरवणार आहे.सरकार व पोलीस प्रशासन यांनी कृती समितीची दखल घेऊन आंबेडकरी जनतेची मागणी मान्य करावी. संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या लगतचा सिव्हील लाईन वर्धा येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने त्वरित स्थलांतरित करावा. असेही आंबेडकरी नेते कृती समितीचे निमंत्रक महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now