नागपूर विधानभवनावर लोक कलावंत शाहिरांचा धडक मोर्चा …..

इस खबर को सुनें

नागपूर विधानभवनावर लोककलावंत शाहिरांचा धडक मोर्चा ….
वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ होणार ! सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही !

(नागपूर ) महाराष्ट्रातील लोककलावंत शाहिरांच्या मोर्चाला नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून सुरुवात झाली . नागपूर विदर्भ पश्चिम महाराष्ट्रतुन महिला , पुरुष लोककलावंत शाहीर मोर्चात सहभागी झाले होते .वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे ! कलाकारों की मांगे पुरी करो नही तो खुर्ची खाली करों ! हम सब कलाकार एक है ! अशा घोषणा देत विधानभवनावर मोर्चा धडकला . विविध संस्थांच्यावतीने लोककलावंत व शाहीर यांचे हितासाठी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या . यामध्ये वृद्ध कलावंतांच्या मानधनात रकमेत वाढ करून १०,००० हजार मिळावे, जिल्हा समितीमध्ये फक्त वार्षिक १०० मानधन प्रकरणे मंजुरीस असतात त्या मानधन प्रकरणाची संख्या ५०० ऐवढी करावी. कारण मागील शेकडो प्रकरने प्रलंबित आहेत. वृद्ध कलावंत वयोमर्यादा कमी करावी. कारण आयुष्यभर प्रवास व अनियमितता अशा कारणाने वृद्धत्व लवकर येते. इनकम सर्टिफिकेट ४८ हजार रुपये वरून २ लाख रुपये करण्यात यावे. सर्व शाहीर कलाकार यांना प्रात्यक्षिक सादर करून मूळ कागदपत्र तपासूनच मानधन अर्ज स्वीकार करावे. जेणेकरून खऱ्या शाहीर लोककलाकारावर अन्याय होणार नाही . याची विशेष काळजी घ्यावी. वृद्ध कलावंतास शासनाकडून सर्व आरोग्यसेवा मोफत मिळव्यात. याबाबत आधार कार्ड प्रमाणे वेगळे शासनमान्य ओळखपत्र शिखर संस्था सभासद कलावंतास द्यावे .वृद्ध कलावंत मानधन रक्कम कलावंतांच्या बँक खात्यात जमा व्हावी. त्यात दर महिन्यात अथवा तिमाहीत नियमितपणा असावा . लोककलावंत शाहीर यांना घर बांधकामास बँक तर्फे संपूर्ण बिनव्याजी शासन शिफारशीने कर्ज मिळावे . त्यांचे हक्काचे घर होण्याचे स्वप्न पूर्ण होईल. वृद्ध कलावंतांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनानेच करावा. सांस्कृतिक कार्य विभागाप्रमाणेच कलावंत व वृद्ध कलावंत सहाय्य विभाग असा स्वतंत्र शासनाचा विभाग असावा. सदर विभाग सांस्कृतिक आणि सामाजिक न्याय विभागाशी संलग्न असावा. सर्व कलावंतास एसटी व रेल्वे प्रवास संपूर्ण मोफत म्हणजे विना शुल्क असावा तसेच आमदार , पत्रकार याप्रमाणे कलाकार नामांकन राखीव असावे. जो त्यांच्या सेवेचा गौरव आहे. कलावंतांना प्रवास करताना सोबत एक व्यक्ती विनाश शुल्क अशी व्यवस्था असावी. कलावंत सहाय्य विभागाचे कलावंत संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यात एक कार्यालय असावे. कलाकारास अपघात विमा मिळावा . शेतकरी मित्र अपघात विमाप्रमाणे कलावंतांस ही विमा सुविधा मिळाव्यात. भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्य कलावंतांचे कार्यक्रम कमी करून डिजिटल व्हॅन, डिजीटल जाहिरातींवर खर्च न करता लोककलावंतांना शासनाच्या विविध योजनांचे जनजागृतीचे कार्यक्रम द्यावेत.

प्रत्येक तालुक्यात सांस्कृतिक भवन बांधून द्यावे .वृद्ध कलाकारांची इच्छा असल्यास आणि तो शारीरिक मानसिक दृष्ट्या योग्य असल्यास तालुका , जिल्हा पातळीवर विविध समित्यांमध्ये त्यास कार्यरत ठेवावे . वृद्ध कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांचे पत्नीस योग्य ती कागदपत्रे पुरावे सादर झाल्यानंतर त्वरित मानधन सुरू व्हावे. ज्या कलावंतांना शासनाचे मानधन मिळते अशा कलावंतांना ओळखपत्र द्यावे . शासनमान्य वृद्ध कलाकारांना घरकुल योजनेअंतर्गत घरकुल देण्यात यावे. लोककलावंतासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे .खडीगंमत पॅकेज प्रमाणे खडी दंडार ,खडी टाका ,संगीत नाटक पॅकेज जाहीर करण्यात यावे. आळंदी ,देहू ,पंढरपूर , त्र्यंबेश्वरमध्ये कीर्तनासाठी भव्य सांस्कृतिक भवन बांधण्यात यावे . श्री संत तुकाराम महाराज , तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीता आणि इतर साहित्याचा शालेय शिक्षणात व विद्यापीठाच्या शिक्षण पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात यावे. श्री संत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी .विधानपरिषदेत महाराष्ट्र मधून एकूण सहा शाहीर कलावंतासाठी जागा राखीव करण्यात यावी .
आदि मागण्याचे वाचन करण्यात आले . या मोर्चाचे नेतृत्व शाहीर राजेंद्र बावनकुळे नागपूर यांनी केले तर मार्गदर्शन लोककलावंत प्रबोधन प्रतिष्ठान परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शाहीर सुभाष गोरे सोलापूर , सचिव शाहीर बाळासाहेब मालुसकर पुणे , शाहीर उत्तम गायकर नाशिक , शाहीर शिवाजी शिंदे अहमदनगर , शाहीर कवीनंद गायकवाड वाशिम ,शाहीर नाना परिहार जालना , शाहीर अशोक शिंदे लातूर यांनी केले

शाहीर कलावंतांचे मागण्याचे निवेदन सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय सुधीरजी मुनगट्टीवार यांना विधान भवनात शाहीर उत्तम गायकर, राजेंद्र बावनकुळे यांच्या शिष्ट मंडळाने दिले .याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी मिश्किल टिप्पणी केली .माझ्या नावातच धीर आहे लोककलावंतांनी शाहीरांनी थोडा धीर धरावा. चालू अधिवेशनात आपल्या सर्व मागण्यावर परिपूर्ण विचार केला जाईल. वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ निश्चित केली जाईल अशी ग्वाही मा सांस्कृतिक मंत्री यांनी दिली. व निवेदन स्वीकारले या लोककलावंत शाहिरांच्या मागण्यासंदर्भात नेहमी लोककलावंतांच्या न्याय हक्काला वाचा फोडणारे मंत्रालयाचे पत्रकार माननीय खंडुराजजी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. लोककलावंत शाहिरांचा मोर्चा शांततेत पार पडला.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now