रोखे खरेदी घोटाळ्यात सुनील केदार दोषी, नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा 22 वर्षांनी निकाल

इस खबर को सुनें

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणावरील निकाल आला आहे. यामध्ये राज्याचे माजी मंत्री सुनील केदार हे या प्रकरणात दोषी आढळले आहेत. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल आला आहे. 2001-02 दरम्यान हा घोटाळा झाला होता. त्यावेळी सुनील केदार बँकेच्या अध्यक्षस्थानी होते. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात खटला न्यायालयात सुरु आहे. यासंदर्भात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी  निकाल जाहीर केला.

सुनील केदार न्यायालयात पोहचले मात्र आणखी एक आरोपी ( नंदकिशोर त्रिवेदी ) त्याचा अपघात झाल्याने तो रुग्णालयात आहे. म्हणून त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे जोडण्यात आले. त्यानंतर निकाल सुनावणी झाली. सुनावणीवेळी 8 आरोपी कोर्टात हजर होते. यावेळी निर्णय देताना कोर्टाने  तत्कालीन बँक अध्यक्ष सुनील केदार, मुख्य रोखे दलाला केतन शेठ, तत्कालीन बॅंक मॅनेजर अशोक चौधरी या तिघांसह आणखी तिघे रोखे दलाल अशा एकूण सहा जणांना दोषी मानले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर केले आहे. शिक्षेच्या प्रमाणावर युक्तिवाद होत असून सहा दोषींच्या वकीलांनी यावेळी युक्तीवाद केला.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now