Featured Video Play Icon

*खासदार रामदास तडस यांच्या मुलीचा .ब्युटी पार्लर मध्ये तांडव…दुकानाची तोडफोड

इस खबर को सुनें

*खासदार रामदास तडस यांच्या मुलीचा ब्युटी पार्लर मध्ये तांडव…दुकानाची तोडफोड 
*प्रकरण राज्यभर गाजण्याची श्यक्यता पत्रकार परिषदेत पिडीत महिलेची धक्कादायक माहिती.
*गुन्हा दखल करू नये करिता पोलिसांवर राजकीय दबाव.
*राजकीय विषय होण्याची शक्यता.

नागपूर (मंगेश चोरे) वर्धा येथील खासदार रामदास तडस यांच्या मुला पाठोपाठ मुलीने हैदोस घालून आर्वी नाका परिसरात ऐका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन तोडफोड केल्याचे प्रकरण आता राजकीय वर्तुळात गाजत चालले आहे. काल नागपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सोनाली जोशी नामक महिला आणी तिच्या पतीने सविस्तर माहिती देऊन या विषयाला उजागर केले.तर खासदार रामदास तडस यांनी आपल्या मुलीवर गुन्हा दाखल करू नये करिता दबाव निर्माण केल्याने आता रामनगर पोलिस सुद्धा अडचणीत येण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे.काचा तोडताना खासदार रामदास तडस यांची मुलगी ..
सदरची महिला ही ब्राह्मण समाजाची प्रामाणिक परिवारातील असून तडस यांच्या मुलीने तिला अनेक दिवस धमकावून पैसे उकळले .तिला बदनाम करण्याच्या धमक्या दिल्या.पैसे देणे बंद केल्याने अखेर तिने जोशी यांच्या पार्लर मध्ये ऐका ईनोवा गाडीत काही महिला पुरुष सोबत घेऊन  तोडफोड केली .तर महिलेचे पती रामानंद जोशी यांना मारहाण केली.हा प्रकार लागलेल्या सी.सी.टीव्हीत रेकॉर्ड झाला.

रामानंद जोशी यांना मारहाण करताना दिसत असलेली खासदार रामदास तडस यांची मुलगी

सदर घटनेची तक्रार रामनगर पोलिसांना देण्यात आली परंतु यात कोणताही गुन्हा दखल करण्यात आला नाही.तर पोलिसांनी दबाव असल्याचे वारंवार महिलेला सांगितले.त्यामुळे त्यांनी नागपुर येथे जाऊन पोलिस उप महानिरीक्षक यांची भेट घेऊन आपली तक्रार दिली.तरी यात तडस यांचा दबाव कायम असल्याने या प्रकरणात आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने यात रामानंद जोशी यांना मारहाण करण्यात सामील असलेल्या बिल्डर सुरेंद्र चामट याने जोशी परिवाराला परिसरात राहणे मुश्किल केल्याचे सांगण्यात येते. जोशी यांनी नागपुर येथे आपला विषय माध्यमांच्या समोर ठेवण्या करीता पत्रकार परिषदेचे आयोजन केले यात सुद्धा अनेकांनी यांना खासदार यांच्या सांगण्यावरून फोन करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला असे कळते.खासदार रामदास तडस यांच्या वादग्रस्त परिवाराची महिमाच न्यारी आहे.यांचा इतिहास वाचायला लागलो तर आपल्याला लाज येते. खासदार साहेबांनी जिल्यातील सार्वजनिक संपत्ती चोरून विकली.रस्त्यालगत आलेले झाडे चोरून विकण्याचा खासदार साहेबांचा मोठा धंदा होता.हे साऱ्या गावाला माहीत आहे. परंतु हे मोठ्या आविर्भावात मी नाही त्यातली असे वागतात. मागिल काळात यांच्या मुलाने वळू गिरी केली ऐका मुलीचे शोषण केले मात्र लग्नाला नकार देऊन हात वर करायला लागला.अखेर आम्हीच मग झेंडा हाती घेतला आणि बोहल्यावर नवरदेव बसवला.त्याला वेसण आम्हीच टोचली हे वर्धेकर आजही विसरले नाही.आज त्याला एक मुलगा झाला तरी त्या मुलीला सुन म्हणायला तयार नाही. आपल्या घरी तिला ठेवले नाही.खासदारांनी नवीन फंडा पुढे आणला म्हणे D.N.A करा नंतर मी माझा नातु म्हणतो.आजही त्या मुलीचे शोषण हा परिवार करीत आहे.तिच्यावरही खोट्या केसेस दाखल केल्या.यात दीड वर्षाने आमचा वचपा काढण्या करिता खासदार असल्याने मात्र यांनी खोट्या तक्रारी देऊन आम्हाला कारागृह दाखवले.वास्तविक न्यायालयात यांची चांगलीच वाट लागणार असून आम्हाला काही फरक पडत नाही.गेलो मस्त मोठ्या वाड्यात. परंतु कायदा हा कुणाची जहागिरदारी नाही.त्यामुळे पुढे आपण अडांनचोट आहोत हे यांना कबूल करावे लागेल यात शंका नाही.पुढे न्यायल्यात यांची पोल खोल होईलच.आणी कदाचित यांच्याही नशिबात मोठ्या वाड्याची सहल करावी लागेल.हल्ली खासदार असल्याने रामदास तडस यांनी सोनाली जोशी यांच्या प्रकरणात पोलिसांवर दबाव टाकून कारवाईला विरोध केला त्यामुळे मात्र पोलिस हे चर्चेत आले आहे. क्रमशः

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now