ठाकरे शिवसेनेचे वर्धा संपर्क प्रमुख हटाव मोहिम पंचविस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे.

इस खबर को सुनें

ठाकरे शिवसेनेचे वर्धा संपर्क प्रमुख हटाव मोहिम पंचविस पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे.


वर्धा(प्रति)
वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख श्री.निलेश धुमाळ यांची उचलबांगडी करण्यात यावी
करिता अनेक दिवसापासून ठाकरे शिवसेनेत अंतर्गत कलह होता.आज याचा स्पोट झाला असुन देवळी येथे पचविस पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे पुढे आले आहे.विशेष असे की यातील काही लोकांच्या नियुक्त्या हल्लीच जाहीर झाल्या असतांना. यांनी आपल्या पदावर पाणी सोडले. हे मात्र विशेष आहे.जिल्हा संपर्क प्रमुख श्री.निलेश धुमाळ यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांवर दबाव आणून आपल्या सार्थाकरिता.पक्ष प्रमुख यांना चुकीचा अहवाल सादर करून नियुक्त्या केल्या,दिनांक २८/१२/२०२३ला सामना या दैनिकातून प्रकाशित नियुक्त्या मधील देवळी आणी आर्वी विधानसभा मतदार संघातील जिल्हा समन्वयक श्री अशोकभाऊ काकडे,(देवळी पुलगाव)विधानसभा तालुका संघटक श्री.संदीप कुचे,(देवळी,पुलगाव)तालुका समन्वयक देवळी श्री पंकज झोरे,तालुका प्रमुख देवळी श्री. सुधीर काकडे,देवळी शहर प्रमुख श्री.निलेश तिडके,श्री. डॉ निलेश गुल्हणे,निवासी उप जिल्हा प्रमुख पुलगाव.या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आज आपले राजीनामे दिले आहे.
यांनी दिलेल्या माहितीत संपर्क प्रमुख निलेश धुमाळ हे कुणालाही विश्वासात न घेता.जिल्याचे रहिवाशी समजून यांना सगळेच माहीत आहे असे समजून आपला निर्णय घेतात.पक्षाच्या निष्ठावान लोकांना डावलून मनात येईल तसे निर्णय घेतात.असा आरोप करून या पूर्वी पक्षाच्या अनेक प्रमुख लोकांना हे निवेदन दिले परंतु काहीही कारवाई होत नसल्याने पक्षप्रमुखांचे लक्ष वेधून यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची धडपड आहे.असे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.यापुढे सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांचे राजीनामे हळू हळू दिले जाणार असून संपर्क प्रमुख हटाव मोहीम राबविली जाणार असे समजते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now