पोलीस आयुक्तांकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार, खात्ययात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत लवकरच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.. सूत्रांची माहिती.

इस खबर को सुनें

पोलीस आयुक्तांकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार, खात्ययात मोठ्या घडामोडी होण्याचे संकेत लवकरच पोलीस अधीक्षकांच्या बदल्या.. सूत्रांची माहिती.

मुंबई –  राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे वयोमानानुसार रविवारी सेवानिवृत्त झाले. पोलीस महासंचालक कोण होणार? याकडे लक्ष लागले असताना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. रविवारी गृहविभागाने हा  निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच पोलीस दलात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे समजते.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ ३१ डिसेंबरला सेवानिवृत्त झाले. सेठ यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी यापूर्वीच नियुक्ती झाली आहे. राज्याच्या महासंचालक पदासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार रश्मी शुक्ला, संदीप बिष्णोई, विवेक फणसळकर, प्रज्ञा सरवदे, जयजित सिंह आणि सदानंद दाते यांचे प्रस्ताव सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविले आहेत. नियमानुसार राज्याच्या महासंचालकपदासाठी किमान सहा महिन्यांपेक्षा अधिक सेवाकाळ शिल्लक असणारा अधिकारी पात्र ठरतो. यातील बिष्णोई आणि सिंह एप्रिलमध्ये सेवानिवृत्त होत असून शुक्ला या जूनमध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर यांची महासंचालकपदी आणि त्यांच्या जागी शुल्का यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.तर लवकरच येत्या दहा दिवसात राज्यातील पोलीस अधिक्षक तसेच,पोलीस आयुक्तांच्या बदल्या जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now