प्रियंका गांधी यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी !

इस खबर को सुनें

    प्रियंका गांधी यांना वर्धा लोकसभेची उमेदवारी !
वर्धा ही महात्मा गांधी यांची कर्मभूमी असुन आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी बोलबाला होता.मोदी लाटेत काँग्रेस उमेदवार कमजोर ठरले असले तरी.या ठिकाणी पूर्ववत आपले वर्चस्व कायम करण्याकरिता आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रियंका गांधी यांना उमेदवारी देण्याचा जवळजवळ निर्णय झाल्याचे विश्वासनीय सूत्राद्वारे कळते . प्रियंका गांधी यांना वर्धा येथे उमेदवारी दिल्यास अनेक लोकसभा काँग्रेसला हस्तगत करता येऊ शकते . विदर्भात काँग्रेसचे पूर्ववत वातावरण निर्माण होऊ शकते. अशा अनेक विषयाला महत्त्व देऊन ही उमेदवारी दिली जाईल असे जाणकार विश्वास व्यक्त करत आहे.वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँगेस विचाराचा असला तरी काँग्रेस पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मतदारांनी पसंती न दिल्याने मोदी लाट असल्याने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा विजय झाला असला तरी.या ठिकाणी प्रियंका गांधी हे समीकरण मात्र अत्यंत अचुक ठरणार असे बोलले जाते.आगामी निवडणुकीच्या तोंडावर वर्धा आणी आर्वी विधानसभा ह्या जागा बदल होण्याचे संकेत असुन आर्वी काँग्रेस पक्षाचे अमर काळे,याचा यावेळी पराभव होणे कठीण आहे.तर वर्धा येथिल जागा बदल झाली तरी येथील आमदार पंकज भोयर हेच असतील असे जनतेच्या निष्कर्षावरून दिसुन येते.प्रियंका गांधी यांना वर्धा उमेदवारी देण्यात आली तर .वर्धा येथील भारतीय जनता पार्टी आपला उमेदवार सुद्धा बदल करेल असे सुद्धा जाणकार बोलत आहेत.जवळ जवळ वर्धा येथुन प्रियंका गांधी यांची उमेदवारी ही निश्चित असल्याचे सूत्रांकडून कळते तसेच काँग्रेसचे दिग्गज सुद्धा या प्रयत्नात आहे

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now