अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांचे थाळी नांद आंदोलन

इस खबर को सुनें

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांचे थाळी नांद आंदोलन

Akola – राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचेकरीता सुधारीत वेतनाप्रमाणे दैनिक भत्ता व प्रवास भत्ता, भ्रमणध्वनी भत्ता लागू करण्यात आला आहे. सदर सुधारीत भत्ता लागू होवून जवळपास १० वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुधारीत भत्ता लागू करणेबाबत शासन स्तरावर कर्मचाऱ्यांच्या मागणी गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे सदरच्या मागण्या राज्य शासनाने मान्य करावे या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर महिला कर्मचाऱ्यांनी थाळी बजाओ आंदोलन केले, या आंदोलनात महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होत्या.
मंजुर एचआर पॉलिसी लागू करणे, अर्जित रजा, वैद्यकिय रजा नियमीत कर्मचाऱ्यानुसार लागू करणे. महागाई निर्देशांकानुसार किमान ४० टक्के मानधन वाढ देणे, अभियान कर्मचाऱ्यास बदली धोरण लागू करणे, एकत्रित, कौटुंबिक, दुर्धर आजार व रिक्त पदी बदली देणे, इपीएफ पुर्वलक्षी प्रभावाने लागू करावा. दरवर्षाची
मुल्यांकन अहवाल पध्दत बंद करावी. पेपॉलिसी लागू करावे व रिक्तपदांवर पदोन्नती द्यावी, प्रवास व दैनिक भत्ता एकत्रिक मानधनामध्ये द्यावा, समायोजन व सर्व सुविधा लागू करावी अभियान कर्मचारी व समुदाय आरोग्य अधिकारी ३ टक्के दरवर्षीचा फरक देण्यात यावा, सीएचओ यांना एकत्रीत ४० हजार प्रति माह पगार देवून त्यावर वाढ करावी, विमा संरक्षण अनुकंपा
पदभरती वाहन व घर कर्ज लागू करून आपल्या कार्यालयामार्फत हमी द्यावी या व इतर मागण्या यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी मांडल्या होत्या.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now