Featured Video Play Icon

वर्धा उपप्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन

इस खबर को सुनें

वर्धा उपप्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती रॅलीचे आयोजन 

 Wardha/ maha news 7

वर्धा उपप्रादेशिक कार्यालयातून सातत्याने चालकांच्या दृष्टीने गेल्या अनेक दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. जिल्ह्यात या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक पारदर्शक कामे केली जात असून .येथील कार्यरत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तथा अधिकारी कर्मचारी सातत्याने झटताना दिसतात. हेल्मेट हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याने सातत्याने जिल्ह्यात हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती केली जात आहे. जनतेने याला अद्याप गांभीर्याने घेतले नसले तरी शासन स्तरावर मात्र या विषयात अत्यंत गांभीर्याने घेऊन जनतेने हेल्मेट वापरावे याकरिता सतत कार्यरत आहे. आज वर्धा जिल्हा उप प्रादेशिक कार्यालयाच्या माध्यमातून हेल्मेट या विषयावर जनजागृती करण्यात आली. यावेळी एका रॅलीचे आयोजन करून हेल्मेट वापरण्याकरिता जनतेला आवाहन करण्यात आले. याप्रसंगी वर्धा परिवहन अधिकारी श्री समीर याकूब यांनी या रॅलीला हिरवी झेंडे देऊन सुरुवात केली. ही रॅली रस्त्याच्या मुख्यमार्गावरून गेल्याने सर्वत्र जनतेला उत्सुकता वाटल्याने हेल्मेट संदर्भात जनतेत प्रभाव निर्माण होईल असे चिन्ह आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now