उद्या आँल इंडिया मुशायरा, कवी संमेलन सावंगी आँडिटोरियम येथे आयोजन, शैलेश अग्रवाल प्रायोजित कार्यक्रम

इस खबर को सुनें

उद्या आँल इंडिया मुशायरा, कवी संमेलन
सावंगी आँडिटोरियम येथे आयोजन, शैलेश अग्रवाल प्रायोजित कार्यक्रम
वर्धा. आँल इंडिया मुशायरा व कवी संमेलनाचे

(एक शाम राष्ट्रीय एकात्मता के नाम) सावंगी येथील दत्ता मेघे आँडिटोरियम येथे बुधवारी, 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित व शेतकरी आरक्षणाचे प्रेणेते शैलेश अग्रवाल प्रायोजित या मुशाय-यात देशभरातील नामांकित 12 शायर सहभागी होणार असून, ही मैफल सर्व नागरिकांकरिता खुली राहणार आहे.
या अखिल भारतीय मुशाय-यात शायर कैसर खालिद (आयपीएस), डाँ. मुमताज नसिम (नवी दिल्ली), डाँ. नदीम शाद (देवबंद, उ. प्र.), मिसम गोपालपुरी (उ. प्र.), कुंवर जावेद (कोटा, राजस्थान), तनवीर गाजी (मुंबई), सरिता जैन (नवी दिल्ली), फारुक जिया (महाराष्ट्र), मुजावर मालेगावी (हास्य कवी), मधु गुप्ता (एटा, उ. प्र.), इम्रान फैज (नागपूर) हे आपल्या शायरीने रसिकांना मंत्रमुग्ध करणार असून, निवेदन सतलज राहत इंदोरी हे करणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख राहतील. आमदार डाँ. वजाहत मिर्झा (यवतमाळ) यांच्या हस्ते उद्घाटन होईल. मुख्य अतिथी म्हणून माजी गृहमंत्री तथा विद्यमान आमदार अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार रणजित कांबळे उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अमर काळे, माजी आमदार राजू तिमांडे, माजी नगराध्यक्ष शेखर शेंडे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे,  काँग्रेस चे  जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर आणि काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांची उपस्थिती राहील. शायरी-कवितांच्या या मेजवानीचा रसिकश्रोत्यांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्य. तसेच प्रायोजक शैलेश अग्रवाल यांनी केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now