राज्यात महिला भगिनी,विद्यार्थी,वकील,पत्रकार सुरक्षित नाहीत सामान्य लोकांनी काय करावं ?

इस खबर को सुनें

राज्यात महिला भगिनी,विद्यार्थी,वकील,पत्रकार सुरक्षित नाहीत सामान्य लोकांनी काय करावं ?

भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा रिपाइं (ए) तर्फे तीव्र निषेध!

वर्धा: जिल्हा प्रतिनिधी
दिनांक : ११ फेब्रुवारी २०२४

पुणे येथे “निर्भय बनो” कार्यक्रमातील प्रमुख वक्ते ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे,ॲड.असीम सरोदे आणि डॉ.विश्वंभर चौधरी तसेच महिला भगिनी यांच्यावर भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी तीव्र निषेध केला आहे.

काय चाललंय हे महाराष्ट्र राज्यात ?
इथ महिला भगिनी, विद्यार्थी,वकील,पत्रकार सुरक्षित नाहीत सामान्य लोकांनी काय करावं ?
भाजपाची हिच झुंडशाही आपल्याला संपवायचीय की नाही ? महाराष्ट्र राज्याचे सरकार नपुंसकाच म्हणायचे का ?
हे सरकार कुणाचं आहे ? कायद्याने चालणारं की भाजपचे गुंड चालवणार ? असेही रिपाइं (ए) चे विदर्भ प्रमुख महेंद्र मुनेश्वर म्हणाले.

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि ना.अजितदादा पवार , ना.देवेंद्र फडणविस उपमुख्यमंत्री व गृहमंत्री पदाचा राजीनामा लवकर द्या. हिटलरशाहीने भाजपाने केलेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे कार्यकर्ते तीव्र निषेध करतो असे पक्षाचे विदर्भ प्रदेश तथा वर्धा जिल्हा अध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
—————————–

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now