“ये शाम मस्तानी” महामैफल शनिवारी न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित भव्य प्रांगणात

इस खबर को सुनें

“ये शाम मस्तानी” महामैफल शनिवारी
न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित भव्य प्रांगणात सादरीकरण

वर्धा : वर्धेकरांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवार २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता “ये शाम मस्तानी” या संगीत महामैफलीचे आयोजन स्थानिक न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित मैदानावर करण्यात आले आहे. या मैफलीत महाराष्ट्रातील चकाकते तारे, महागायक वर्धेकरांच्या भेटीला येत आहेत.
ही मैफिल झी मराठी सारेगम फेम व गौरव महाराष्ट्रचा अभिषेक मारोटकर, प्रसिद्ध पार्श्वगायक ऋषीकेश रानडे, लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या सुचित्रा भागवत व प्रसिद्ध गायिका मानसी परांजपे-दातार आपल्या शब्दसुरांनी सजवणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रवेशपत्र मुडके बुक स्टॉल, बजाज चौक, काळे झेरॉक्स, सोशालिस्ट चौक, पांगूळ कॅँटीन, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ,नॅशनल रेफ्रिजरेशन अँड इलेक्ट्रिकल, शास्त्री चौक, शुभ मंगल रेडिमेड, आर्वि चौक जवळ, क्रॉस वर्ल्स मेन्स वेअर, वंजारी चौक, मा भवानी बिछानयत केंद्र, निलेश बाईक रिपेअरींग सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपलब्ध आहेत. या कार्यक्रमाचा वर्धेकरांनी लाभ घेण्याचे आवाहन वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now