भारतीय जनता पार्टी कडून सागर मेघे !

इस खबर को सुनें
      भारतीय जनता पार्टी कडून सागर मेघे !
वर्धा (मंगेश चोरे)  लोकसभा निवडणुका काही दिवसावर आल्याने. कोण कोणत्या पार्टीचे उमेदवार असेल .याची जोरात चर्चा आहे.काँग्रेस पक्षातून अनेक नावं पुढे येत असताना प्रियंका गांधी,सुप्रिया सुळे, हे नवे सुद्धा चर्चेत आले.दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून, माजी मंत्री ,पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चांगलीच चर्चा झाली.काँग्रेस आणी शरद पवार गट,कुणाला उमेदवारी देणार यानंतर समीकरण सुटेल.परंतु काँग्रेस कडून तगडा उमेदवार दिसुन येत नसल्याने भारतीय जनता पार्टी कडून कोण ? याची चर्चा जोरात असताना हल्ली तरी सागर मेघे हे निवडणूक रिंगणात उतरू शकते.असे संकेत सूत्रांकडून प्राप्त होते.प्रस्तापित खासदार यांचा पत्ता कट झाल्याचे चर्चेत आहे.तर पक्षातून सुद्धा सागर मेघे यांच्या नावाला पसंती असल्याचे समजते.सागर मेघे यांच्या उमेदवारीला सर्वत्र पसंती दिसत आल्याने.जवळ जवळ भारतीय जनता पार्टी कडून आज तरी सागर मेघे.यांची उमेदवारी ही पक्की असल्याचे चित्र आहे. सागर मेघे यांचे जिल्यातील असलेले योगदान लक्षात घेता यावेळी सागर मेघे यांच्या उमेदवारीला नक्कीच विजय प्राप्त होईल. असा अनेक राजकीय लोकांच्या कौल दिसतो.हल्ली तरी काँग्रेस पक्षाकडे मजबूत असा उमेदवार नाही.खासदार रामदास तडस यांना ही उमदवारी दिल्यास पवार गट माजी आमदार राजू तिमांडे यांना रिंगणात उतरवेल.यामुळे तेली समाजाचे मते विभगली जाईल.याचा फायदा पवार गटाला मिळेल यामुळे.यावेळी भा.ज.प पक्षाने वेगळी खेळी केली की काय?सागर मेघे हे सर्वांना चालणारे उमेदवार असुन जिल्यातील इतर पक्षांतील त्यांचे समंध हे सुध्दा तितकेच महत्वाचे गणित ठरणारे आहे.सागर मेघे यांच्या उमेदवारीने लोकसभेची निवडणूक ही.भारतीय जनता पार्टीच्या बाजूची असेल असे सर्वत्र चर्चेत आहे.गांधी यांची कर्मभूमी असल्याने या ठिकाणी काँग्रेस पक्षाला आपला दबदबा कायम ठेवायचा असल्यास मात्र प्रियंका गांधी यांची उमेदवारी राहिल्यास.समीकरणात मोठा बदल होईल.परिणामी याचा फायदा हा विधानसभा निवडणुकांना सुद्धा मिळेल.या वेतिरिक्त सुप्रिया सुळे यांची उमदवारी असल्यास सागर मेघे हे निवडणूक रिंगणातून माघार घेतील हे तितकेच खरे.परत समीकरण बदलेल.या वेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.आता मात्र विजय कुणाचा हा अंदाज लावणे कठीण होईल.परंतु या दोन नावाला वगळता उमेदवार टाकण्यात आले तर सागर मेघे हे निश्चित निवडणूक जिंकणार यात शंका नाही.
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now