केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केली वर्धा परिवहन विभागाची स्तुती. जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात राबवला अनोखा कार्यक्रम.

इस खबर को सुनें

 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केली वर्धा परिवहन विभागाची स्तुती. जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात राबवला अनोखा कार्यक्रम.

वर्धा(प्रतिनिधी)

वर्धा परिवहन विभागाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण असा एक कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी रस्त्यावर होणाऱ्या अपघातावर आळा बसावा याकरिता मोकाट फिरणाऱ्या जनावरांना रिफ्लेक्शन बेल्ट म्हणजेच रात्रीच्या वेळी चमकणारा पट्टा लावण्याचा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम वर्धा परिवहन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आला. सदर विषयाला येथील जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी अत्यंत महत्त्व देऊन याला सर्वत्रिक राबवण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील परिवहन अधिकारी श्री समीर शेख यांना चालना देऊन अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील मोकाट फिरणारे विविध जनावरे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना दुरून दिसून येतात. आज सिंधी रेल्वे येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांना जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमाची माहिती देऊ सदरचे रिफ्लेक्शन दाखवून माहिती दिली. गडकरी यांनी या अनोख्या उपक्रमाची स्तुती केली. जिल्ह्यात या प्रकारचा प्रथमच जन उपयोगी असा कार्यक्रम राबविण्यात परिवहन विभागाने पुढाकार घेतल्याने सर्व स्तरातून त्यांची स्तुती केली जाते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now