महाविकास आघाडीला वर्धा लोकसभेत  राजू तिमांडे हाच पर्याय?

इस खबर को सुनें

महाविकास आघाडीला वर्धा लोकसभेत राजू तिमांडे हाच पर्याय?

वर्धा(मंगेश चोरे) आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीला वर्धा लोकसभेत तोडीचा उमेदवार कोण असेल ? यावर विचार मंथन सुरू असताना माजी आमदार अमर काळे यांच्या नावाची जोरात चर्चा झाली. दोन दिवसाआधी माजी आमदार प्राध्यापक राजू तिमांडे यांच्या नावाची चर्चा होती. वास्तविक राजू तिमांडे हे पवार गटाचे निष्ठावान असल्याने यांनी उमेदवारी मिळावी याकरिता इच्छासुद्धा व्यक्त केली. अशातच माजी आमदार अमर काळे यांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा आग्रह धरण्यात आल्याची चर्चा आहे .परंतु मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा करून कळवतो. असे मत अमर काळे यांनी व्यक्त केल्यामुळे अमर काळे उमेदवारी स्वीकारण्यास तयार नाही अशी दिसते. वास्तविक अमर काळे हे निष्ठावंत काँग्रेसचे असल्याने तूतारी या चिन्हावर निवडणूक कसे लढतील ? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. यावेळी मतदारसंघांमध्ये तिमांडे हेच एक मोठा बलाढ्य उमेदवार ठरू शकते. अशी सर्वत्र चर्चा आहे. वास्तविक राजू तिमांडे यांचे संपूर्ण लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क तसेच तिमांडे हे तेली समाजाचे असल्याने मताचे विभाजन आणि त्यांचा इतरत्र समाजामध्ये असलेला लोक संपर्क यामुळे  लोकसभेकरिता बलाढ्य उमेदवार ठरू शकते अशी जनसामान्यातुन चर्चेतून कळते.
अद्याप महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर न झाल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. याव्यतिरिक्त बाहेरील कोणी बलाढ्य उमेदवार रिंगणात उतरतो की काय ? याकडे सुद्धा अनेकांचे लक्ष आहे. हल्ली पवार गटाकडून तिमांडे यांच्या उमेदवारीला नाकारलेले नसून यावर विचार मंथन सुरू असल्याचे कळते. हिंगणघाट मतदार संघातील  यांचे असलेले वर्चस्व तसेच वर्धा विधानसभा क्षेत्रातील  यांचे जवळचे संबंध आर्वी मतदार संघातील महाविकास आघाडीचे मते देवळी मतदारसंघातील महाविकास आघाडीचे मते या सर्वांचा विचार केल्यास प्राध्यापक राजू तिमांडे यांची उमेदवारी हे अत्यंत फायदेशीर ठरू शकते अशी चर्चा आहे. दुसरीकडे  हा एकच पर्याय हल्ली तरी महाविकास आघाडी पुढे असल्याचे दिसून येते.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now