तिमांडे यांना उमेदवारी मिळाल्यास माझी उमेदवारी नसेल”- सुरेश वाघमारे

इस खबर को सुनें

तिमांडे यांना उमेदवारी मिळाल्यास माझी उमेदवारी नसेल

– सुरेशभाऊ वाघमारे.

वर्धा ( मंगेश चोरे) वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवार जाहीर केल्यानंतर काट्याची टक्कर देणारा उमेदवार महाविकास आघाडीचा असला पाहिजे. यावर सर्वत्र विचारमंथन सुरू असताना भारतीय जनता पार्टीत अनेक बंडखोर उमेदवार समोर आले असल्याचे चिन्ह आहे. यातच माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे यांच्या उमेदवारीने समीकरणात अत्यंत मोठा बदल होईल. यामुळे भारतीय जनता पार्टी सुद्धा चिंतेत आहे. माजी खासदार सुरेशभाऊ वाघमारे यांचे धामणगाव तसेच चांदुर रेल्वे या परिसरात असलेले वर्चस्व आणि त्यांचा जनसंपर्क आजही कायम असल्याने अनेकांनी सुरेश वाघमारे त्यांच्यावर विश्वास दर्शविला आहे. तसेच विद्यमान खासदार रामदास तडस यांचा प्रचंड विरोध होत असल्याने या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीला हवे तसे महत्त्व प्राप्त होत नसल्याने तेली समाजाचा दुसरा उमेदवार कोण? यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीने तेली समाजाचा उमेदवार न दिल्याने माजी आमदार राजू तिमांडे हे एक मात्र तेली समाजाचे उमेदवार ठरू शकतात. राजू तिमांडे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यास आपण उमेदवारी टाकणार नाही असे सुरेशभाऊ वाघमारे यांनी व्यक्त केल्याने सुरेशभाऊ वाघमारे यांच्या संपर्कातील सर्व मतदार हे राजू  तिमांडे यांना महत्त्व देतील असे दिसून येते. यामुळे महाविकास आघाडी राजू तिमांडे यांना उमेदवारी जाहीर करतील असे आता संकेत निर्माण झाले आहे
<span;> या व्यतिरिक्त देवळी पुलगाव विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात मते मिळू शकते आर्वी आणि वर्धा या मतदारसंघातून तिमांडे  यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच हिंगणघाट मतदार संघातील तिमांडे यांची कारकीर्द सर्वांना माहीत असल्याने यावेळी महाविकास आघाडीकडून किमान यांना उमेदवारी मिळाल्यास विजय नक्कीच होईल असे मतदार मत व्यक्त करत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now