काळे यांच्या उमेदवारीने परत भारतीय जनता पार्टीचा सरळ विजय.जनसामान्यांची चर्चा..

इस खबर को सुनें

काळे यांच्या उमेदवारीने परत भारतीय जनता पार्टीचा सरळ विजय.जनसामान्यांची चर्चा..
वर्धा(मंगेश चोरे) वर्धा मतदार संघात महाविकास आघाडीने अमर काळे यांचे नाव जाहीर केल्याची चर्चा सर्वत्र पसरत असल्याने. ही उमेदवारी भारतीय जनता पार्टीला टक्कर देऊ शकत नाही अशी सर्वत्र चर्चा कानी येत आहे.आर्वी मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार अमर काळे यांचा मागील पाच वर्षात. लोकसभा मतदारसंघात कसलाही संपर्क नाही. याव्यतिरिक्त केवळ आर्वी मतदार संघापुरते मर्यादित असलेले. पराभूत आमदार भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज उमेदवाराला प्रतिस्पर्धी ठरूच शकत नाही .अशी जनसामान्यात चर्चा आहे. याव्यतिरिक्त अमर काळे हे कुणबी समाजाचे असल्याने समाजातील सर्वाधिक जनसमुदाय हा भारतीय जनता पार्टीला जुळला असल्याने जातीचे कोणतेही समीकरण या उमेदवारीला लागू होत नाही. यामुळे तेली समाजातील सरसकट मते हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पदरी पडून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हेच विजय प्राप्त करतील. अशी सर्वत्र चर्चा कानी येत आहे. माजी आमदार अमर काळे यांचा जनसंपर्क नसल्याने वर्धा देवळी पुलगाव हिंगणघाट समुद्रपूर या परिसरात त्यांना प्रतिसाद मिळेल असे दिसून येत नाही असे जनतेतून कानी येते. याव्यतिरिक्त यातील अनेक मतदार संघ हे तेली समाजातील जनतेने व्यापलेले असल्याने अमर काळे यांना पसंत करतील काय हा सुद्धा प्रश्न जनतेत चर्चेत आहे. महाविकास आघाडीने अमर काळे यांना उमेदवारी दिल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर  अनेकांची भ्रमनिराशा झाल्याचे दिसून येत आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now