माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारीवर शरद पवार यांचे कडून तूर्तास स्वल्पविराम .म्हणाले जरा थांबा.!

इस खबर को सुनें

माजी आमदार अमर काळे यांच्या उमेदवारीवर शरद पवार यांचे कडून तूर्तास स्वल्पविराम .म्हणाले जरा थांबा.!
वर्धा( मंगेश चौरे) लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना शरदचंद्र पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर उमेदवारी दिल्याचे अध्यापतरी स्पष्ट नाही. आज झालेल्या मुंबई येथील बैठकीत पवार यांनी तूर्तास थांबा. असे म्हटल्याने काळे यांच्या उमेदवारीवर गदा येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी यांच्या उमेदवारीला केलेला विरोध आणि घेतलेल्या पत्रकार परिषदा तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात निर्माण होत असलेला अंतर्गत असंतोष काळे यांच्या उमेदवारीवर गदा आणेल काय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे प्राध्यापक राजू तिमांडे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे शरदचंद्र पवार यांचे निष्ठावान असल्याने त्यांनी उमेदवारीवर दावा केला. यापूर्वी भारतीय जनता पक्षातून माननीय नितीनजी गडकरी यांनी तिमांडे यांना अनेकदा भारतीय जनता पक्षात यावे आणि लोकसभा लढावी असा आग्रह धरला होता. परंतु माननीय शरदचंद्र पवार यांच्या प्रेमापोटी  तिमांडे हे पक्षाशी निष्ठावान राहून काम केले  परंतु  हल्ली आगामी लोकसभेची उमेदवारी मागितल्याने पक्ष प्रमुख विचारात पडले आहे. जवळजवळ सर्वत्र उमेदवाऱ्या जाहीर झाल्या असून  वर्धा येथील उमेदवारी मात्र अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे आज झालेल्या बैठकीत काळे यांना तूर्तास थांबा असा स्वल्पविराम दिल्याने. पुढे काय होणार ! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now