इस खबर को सुनें

 

आज *प्रमुख उमेदवार, एका मंचावर*
वर्धा श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम

वर्धा : वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या वर्धा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांना मतदारांच्या समक्ष प्रस्तुत करण्याकरिता शनिवार 13 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता *प्रमुख उमेदवार, एका मंचावर* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक आखाड्यात उतरलेल्या उमेदवारांना मतदारांना ऐकता यावे, जोखता यावे, याकरिता न्यू इंग्लिश हायस्कूलच्या जेलरोड स्थित विस्तीर्ण मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात एनडीए- महायुती अर्थात भाजपाचे उमेदवार खासदार रामदास तडस, इंडिया- महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अमर काळे, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. राजेंद्र साळुंखे आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार डॉ. मोहन राईकवार यांचा सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते विजय जावंधिया राहतील.
या कार्यक्रमात दखलपात्र उमेदवारांनाच आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात उमेदवारांनाच आपली बाजू मांडायची असून, त्यांच्या प्रतिनिधींना बोलण्याची संधी दिली जाणार नाही. लोकशाहीच्या या सोहळ्यात मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केले आहे.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now