आता विचार करा खासदार कसा असावा. अडाणचोट की सुसभ्य..

इस खबर को सुनें

आता विचार करा खासदार कसा असावा. अडाणचोट की सुसभ्य..


वर्धा(प्रती)अमर काळे यांच्या अत्यल्प शब्दातील भाषणाने रामदास तडस यांची विकेट पडणार हे सिद्ध झाले आहे. आज पत्रकारांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमर काळे यांनी अत्यल्प मार्मिक शब्दात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रामदास तडस यांची चांगलीच खेचली . लोकप्रतिनिधी हा जनतेचा वकील असला पाहिजे.त्याने त्या ठिकाणी जनतेची योग्य वकील केली पाहिजे.तरच विकास कामे होऊ शकतात. अशा शब्दात वकील म्हणजे शिकलेला माणूस अडाणचोट नव्हे . हे जनतेच्या लक्षात आणून दिले. अनेक उदाहरणे देताना. देशात चालु असलेली तानाशाही संपवणे अत्यंत गरजेचे झाले असून. केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार असताना दहा वर्षे राहिलेल्या खासदारांचे विकास कामे कोणती? या मुद्द्यावर बोलताच जनतेतून अनेक प्रकारचे आवाज येऊ लागले होते . मागील काळात भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार श्री सुरेश वाघमारे यांनी खासदार रामदास तडस निष्क्रिय असल्याचे व्यक्त केले होते .तीच बाब पुढे आली आहे . मी जनतेला कोणत्याही प्रकारचे आश्वासन देत नाही जर निवडून आलो तर संसदेत मात्र आपली वकिली योग्य पद्धतीने पार पाडेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले .पत्रकारांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे. कोणत्याही प्रकारचे लिखाण केल्यास त्याच्यावर कारवाया होतात. ही संपूर्ण देशात स्थिती आहे. विरोधकांना दाबण्याकरिता सी.बी.आयचा ई .डी. चा गैरफायदा घेतला जात आहे. असे अनेक मुद्दे त्यांनी यावेळी घेतले. दहा वर्षांमध्ये बजाज चौकातील उडान पुल पूर्ण होऊ न शकल्याने वर्धेचे खासदार किती विकास कामे करू शकले असतील? यावर सुद्धा त्यांनी शंका घेतली. मागील काळात रामदास तडस यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना आपले कोणी ऐकत नाही .असे व्यक्त केले होते. सदरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनीच आपले स्टेटमेंट देऊन व्हिडिओ हा माझा नव्हेच असे सुद्धा प्रसिद्धी पत्रक काढून. नेहमी प्रमाणे पोलिसात तक्रार सुद्धा दाखल केली होती. अमर काळे यांनी केलेल्या भाषणाचा अत्यंत व्यापक असा मतदारांवर परिणाम होणार असे चित्र असुन रामदास तडस यांची विकेट गेली असे स्पष्ट आहे.अश्या जनतेच्या प्रतिक्रया आहेत.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now