हेतुपुरस्सर बदलाविला व्होटिंग मशीनचा क्रम ॲड. दीपक मोटवानी, यांचा आरोप.खोटी तक्रार नोंदवून गुन्हे दाखल केल्या प्रकरणात.गप्प बसणार नाही.असा इशारा.

इस खबर को सुनें

हेतुपुरस्सर बदलाविला व्होटिंग मशीनचा क्रम
ॲड. दीपक मोटवानी, यांचा पत्रकार परिषदेत आरोप. अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

वर्धा.  (प्रती)आर्वी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह जनतानगर या केंद्र क्रमांक 174 मध्ये वोटिंग मशीन अल्फाबेटिकली न लावता दोन क्रमांकाची मशीन पहिले आणि पहिल्या क्रमांकाची मशीन दुसऱ्या क्रमांकावर लावण्यात आली. यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार अमर काळे यांना मतदान होऊ नये असा हेतू होता. या प्रकाराला जबाबदार असलेल्या तीन अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऍड. दीपक मोटवानी यांनी आज 30 एप्रिल रोजी पत्रकार परिषदेतून केली.
पुढे बोलताना ऍड. मोटवानी म्हणाले की, या केंद्रावर मशीनचा क्रम बदलविण्यात आल्याची माहिती काही मतदारांनी मला दिली. खतर जमा करण्याकरिता केंद्रावर गेलो असता तिथे मशीनचा क्रम उलटा लावण्यात आल्याचे माझ्या दिदर्शनास आले. या संदर्भात केंद्राधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी मला झोनल ऑफिसर व सहाय्यक निवडणूक अधिकारी यांनी अशाच पद्धतीने ईव्हीएम ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत असे उत्तर दिले. याबाबत मी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आर्वी विश्वास शिरसाट यांना फोन द्वारे संपर्क साधला असता त्यांनी दहा मिनिटात मी तिथे पोहोचत असून आपण कोणतीही तक्रार करू नये अशी विनंती केली. त्यानंतर ते लगेच पोहोचले आणि ईव्हीएम पाहून त्यांनी ते चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचे स्पष्ट करीत सोळा उमेदवारांची ईव्हीएम मशीन पहिल्या क्रमांकावर आणि नऊ उमेदवारांची ईव्हीएम मशीन दुसऱ्या क्रमांकावर लावायला लावली.
याबाबत कोणती लेखी तक्रार करू नये अन्यथा आमच्यावर कारवाई होईल अशी विनंती केंद्राध्यक्ष व झोनाल ऑफिसर यांनी केली. म्हणून मी त्यांच्या घरकुत्याची लेखी तक्रार दिली नाही. मात्र तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी एकाने या संपूर्ण घटना क्रमाचा व्हिडिओ काढला. याचा आरोप माझ्यावर लावून संबंधित अधिकाऱ्यांनी माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या संदर्भात मला वृत्तपत्राच्या माध्यमातून 29 एप्रिल ला कळले की माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझ्याविरुद्ध केलेले आरोप कपोलकल्पित व पूर्णतः खोटे आहेत.
मी अधिकाऱ्यांशी बोलत असताना मीच कसा काय व्हिडिओ शूटिंग करू शकतो, केलेल्या आरोप हे सर्वसाधारण चुकीचे असून, मी माणुसकीच्या दृष्टीने मशिनीचा क्रम चुकीचा लावल्याची तक्रार केले नाही. त्याचा गैरफायदा घेऊन उलट माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, डोनल ऑफिसर विनीत साबळे, केंद्राध्यक्ष अनंत भोयर या तिघांनी मिळून मशीनचा क्रम बदलण्याचे काम केले तसेच या तिघांनी माझ्याविरुद्ध खोटी तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन या तीनही अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऍड. दीपक मोटवानी ज्यांनी यावेळी केली. याप्रसंगी मनोज चांदूरकर, श्रीकांत मिरापुरकर यांनी हा प्रकार गंभीर असून, अमर काळे यांना मतदान पडू नये, याकरिता केलेला कट असल्याचा आरोपी केला.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरापूरकर, आजचे जिल्हाप्रमुख प्रमोद भोमले, सुधीर पांगुळ मुन्ना झाडे मंगेश शेंडे आदींची उपस्थिती होती.

हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
अभी यहाँ क्लिक करके डाउनलोड करें  
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now